रामेश्वरम कॅफे बॉम्बस्फोट: आरोपीवर 10 लाख रुपयांचे बक्षीस जाहीर!

पुढारी ऑनलाईन डेस्क : Rameshwaram Cafe Blast Case : बंगळूरच्या रामेश्वरम कॅफे बॉम्बस्फोट प्रकरणात एनआयएने हल्लेखोराची माहिती देणाऱ्यास 10 लाख रुपयांचे रोख बक्षीस जाहीर केले आहे. हल्लेखोराची माहिती देणाऱ्या व्यक्तीची ओळख गोपनीय ठेवली जाईल. पूर्व बंगळूरच्या ब्रुकफील्ड येथील रामेश्वरम कॅफेमध्ये 1 मार्च रोजी झालेल्या स्फोटात किमान 10 जण जखमी झाले होते. या स्फोटाचा तपास एनआयएकडे … The post रामेश्वरम कॅफे बॉम्बस्फोट: आरोपीवर 10 लाख रुपयांचे बक्षीस जाहीर! appeared first on पुढारी.

रामेश्वरम कॅफे बॉम्बस्फोट: आरोपीवर 10 लाख रुपयांचे बक्षीस जाहीर!

Bharat Live News Media ऑनलाईन डेस्क : Rameshwaram Cafe Blast Case : बंगळूरच्या रामेश्वरम कॅफे बॉम्बस्फोट प्रकरणात एनआयएने हल्लेखोराची माहिती देणाऱ्यास 10 लाख रुपयांचे रोख बक्षीस जाहीर केले आहे. हल्लेखोराची माहिती देणाऱ्या व्यक्तीची ओळख गोपनीय ठेवली जाईल. पूर्व बंगळूरच्या ब्रुकफील्ड येथील रामेश्वरम कॅफेमध्ये 1 मार्च रोजी झालेल्या स्फोटात किमान 10 जण जखमी झाले होते. या स्फोटाचा तपास एनआयएकडे सोपवण्यात आला आहे. टोपी, मास्क आणि चष्मा घातलेला एक माणूस या प्रकरणात मुख्य संशयित असून त्याचा ठावठिकाणा अद्याप अज्ञात आहे.

NIA announces cash reward of 10 lakh rupees for information about bomber in Rameshwaram Cafe blast case of Bengaluru. Informants identity will be kept confidential. pic.twitter.com/F4kYophJFt
— NIA India (@NIA_India) March 6, 2024
कॅफेमध्ये 1 मार्च रोजी स्फोट झाल्यानंतर पोलिसांनी या घटनेचा तपास सुरू केला. बॉम्बस्फोटाचे सीसीटीव्ही फुटेज समोर आले. यात एक व्यक्तीने रवा इडली मागवल्याचे दिसून येते. यानंतर त्याने आपली बॅग काउंटरजवळ ठेवली आणि ऑर्डर न घेता तो निघून गेला. कॅफेच्या बाहेर लावण्यात आलेल्या सीसीटीव्ही फुटेजमध्ये हा व्यक्ती वेगाने धावताना दिसत आहे. फुटेजमध्ये त्या व्यक्तीने टोपी घातली असून त्याच्या हातात बॅग असल्याचे दिसून आले. त्याने मास्क आणि चष्माही घातला होता. या घटनेचा तपास एनआयएकडे सोपवण्यात आल्यानंतर तपास यंत्रणेने आरोपीचे छायाचित्र प्रसिद्ध करून त्याच्याबद्दल माहिती देण्याचे आवाहन केले आहे. या प्रकरणी एखाद्याला माहिती द्यायची असल्याने त्यांनी 080-29510900 आणि 8904241100 या क्रमांकावर किंवा info.blr.nia@gov.in यावर इ-मेलवर संपर्क साधावा असे परिपत्रकात म्हटले आहे.
Latest Marathi News रामेश्वरम कॅफे बॉम्बस्फोट: आरोपीवर 10 लाख रुपयांचे बक्षीस जाहीर! Brought to You By : Bharat Live News Media.