केस पिकलेत? पण यावर आहे उपाय, जाणून घ्या अधिक
वैद्य विनायक खडीवाले
रोगाचे नाव : पलित, चाई
पोटभेद : कोड, दीर्घ मुदतीचा ताप
अवस्था ः रूक्ष, तेलकट
दोष ः कफ, वात
धातू ः अस्थिरक्त
संबंधित अवयव ः डोके
बदलत्या जीवनशैलीमुळे कमी वयामध्ये केस पिकण्याची समस्या सर्वदूर दिसू लागली आहे. यावर उपाय म्हणजे आरोग्यवर्धिनी रोज सकाळी व संध्याकाळी तीन तीन गोळ्या रिकाम्या पोटी चावून खाव्यात. महाभृंगराज तेल सकाळ – संध्याकाळ डोक्याला चोळावे. सकाळी 1 चमचा रसायनचूर्ण खावे. रात्री योगवाही त्रिफळा चूर्ण किंवा आवळकाठी चूर्ण एक चमचा घ्यावे. (Hair Care)
कफाने केस पिकले असल्यास 1 भाग बावची तेल व 4 भाग महाभृंगराज तेल मिश्रण करून मसाज करावा. सकाळी उपळसरी चूर्ण 1 चमचाभर खावे. शतावरी कल्पासारखा मक्याच्या रसाचा भृंगराज कल्प करावा. तो सकाळी व संध्याकाळी तीन चमचे एक कप गरम दुधात मिसळून घ्यावा. कल्पाअभावी पोटात ताज्या माक्याचा रस दोन चमचे रोज घ्यावा.
ग्रंथोक्त उपचार : जपाकुसुमादि तेल, जास्वंदीच्या फुलाच्या चटणीचा लेप, ब्राह्मी तेल, अणुतेल नस्य, अमृतभल्लातककल्प,
विशेष दक्षता व विहार : केसात ओलावा राहू देऊ नये. खसखसून केस पुसावेत व विंचरावेत. शाम्पू, कलप, साबण वापरू नये, शिकेकाई, डाळीचे पीठ वापरावे. खारट, आंबट पदार्थ कटाक्षाने वर्ज्य करावेत.
पथ्य : जेवणात सालासकट उडीद व मुगाचा वापर करावा. सकस अन्न खावे. आहारात दुधाचा समावेश असावा. गार पाण्याची आंघोळ चांगली. केसात जास्त मल साठला तर गरम पाणी वापरावे. हातसडीचे तांदूळ व गूळ वापरात असावा.
कुपथ्य : आंबट, खारट, तिखट पदार्थ, डालड्याचे पदार्थ, शिळे व निकृष्ट अन्न, चिंता, जागरण, मीठ, आंबवलेले पदार्थ, फरसाण.
सायनचिकित्सा : रसायनचूर्ण, च्यवनप्राश.
योग व व्यायाम : चिंता, जागरण नको, गार पाण्याची आंघोळ.
रुग्णालयीन उपचार : चमन गोटा करून मसाज, शास्त्रशुद्ध पद्धतीने नस्य.
अन्य षष्ठी उपक्रम (पंचकर्मादी) मसाज, नस्य, केश्य चूर्णाने केस धुवावेत.
चिकित्साकाल : नवीन चांगले छोटे केस येण्यास एक ते तीन महिने लागतात.
अपुनर्भवचिकित्सा : चूर्ण, च्यवनप्राश, गायीचे दूध, द्राक्षे, मनुका, माक्याचा रस.
संकीर्ण : केस हा हाडांचा शुद्ध भाग आहे. वातापासून काळसर, कफापासून पांढरे, पित्तापासून पिवळट रंगाचे केस असतात. शिकेकाई, आवळकाठी, नागरमोथा, बावची प्रत्येकी 5 ग्रॅम यांचा काढा करून केस धुण्याकरिता वापरावा. (Hair Care )
Latest Marathi News केस पिकलेत? पण यावर आहे उपाय, जाणून घ्या अधिक Brought to You By : Bharat Live News Media.