जामखेड गोळीबार प्रकरण : सराईत गुन्हेगार चिंग्या मोरे साथीदारासह गजाआड
नगर : Bharat Live News Media वृत्तसेवा : पोलिसांत तक्रार दिल्याच्या रागातून तक्रारदारांवर गोळीबार करणारा अक्षय उर्फ चिंग्या मोरे याला स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी वाकी (ता. जामखेड) याला साथीदारासह जेरबंद केले. अक्षय ऊर्फ चिंग्या विश्वनाथ मोरे (वय 20, रा. पाटोदा, ता. जामखेड), कुणाल जया पवार (वय 22, रा. कान्होपात्रा नगर, ता. जामखेड) अशी अटक आरोपींची नावे आहेत. पोलिसांकडून मिळालेली माहिती की, 3 मार्च 24 रोजी आबेद बाबुलाल पठाण (वय 40, रा. भवरवाडी, ता. जामखेड) हे लेबर मुकादम असून, त्यांच्याकडील मजूर लक्ष्मण कल्याण काळे (रा. जामखेड) यास अक्षय ऊर्फ चिंग्या मोरे याने दीड वर्षांपूर्वी मारहाण केल्याने त्याच्याविरूद्ध जामखेड पोलिस ठाण्यात तक्रार दिली होती.
त्याचा राग मनात धरून आरोपी अक्षय मोरे याने त्याचे साथीदारासह येऊन फिर्यादीस शिवीगाळ करून, जिवे ठार मारण्याच्या उद्देशाने पिस्टलने गोळ्या झाडल्याने फिर्यादीचे उजव्या पायाचे पोटरीला दुखापत केली. याबाबत आबेद पठाण यांच्या फिर्यादीवरून जामखेड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. गुन्ह्याचे गांभीर्य ओळखून पोलिस अधीक्षक राकेश ओला यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक दिनेश आहेर यांना स्वतंत्र पथक नेमूण तपासाच्या सूचना केल्या. त्यानुसार पोलिस निरीक्षक आहेर यांनी उपनिरीक्षक तुषार धाकराव, अंमलदार बापुसाहेब फोलाणे, रविंद्र कर्डिले, विश्वास बेरड, विशाल दळवी, रोहित मिसाळ, बबन मखरे, देवेंद्र शेलार, विजय ठोंबरे, प्रमोद जाधव, मेघराज कोल्हे, रणजित जाधव, प्रशांत राठोड, उमाकांत गावडे व भरत बुधवंत यांच्या पथक नेमूण तपासासाठी रवाना केले.
पोलिस पथकाने तत्काळ घटनास्थळी धाव घेऊन आजूबाजूच्या सीसीटीव्ही फुटेजची तपासणी केली. पोलिस पथकाने आरोपी विंचरणा नदी पात्रात दडून बसल्याची माहिती मिळाली. त्यानुसार पथकाने विंचरणा नदीत सापळा लावला. दोन तासात काटवनामध्ये शोध घेऊन कुणाल जया पवार याला ऊसाच्या शेतात पळून जाताना पकडले. त्याचा साथीदार आरोपी अक्षय ऊर्फ चिंग्या मोरे याला वाकी (ता.जामखेड) येथून ताब्यात घेतले. आरोपींकडे चौकशी केली असता त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली. त्यांच्याकडून गुन्ह्यात वापरलेला गावठी कट्टा व मोटारकार ताब्यात घेतली. आरोपींना पुढील तपासाकामी मुद्देमालासह जामखेड पोलिस ठाण्यात हजर केले.
आरोपी मोरे याच्यावर पाच गुन्हे
आरोपी अक्षय ऊर्फ चिंग्या विश्वनाथ मोरे हा सराईत गुन्हेगार असून त्याच्याविरुध्द खून, खुनाचा प्रयत्न व गंभीर दुखापत असे एकूण पाच गुन्हे जामखेड पोलिस ठाण्यात दाखल आहेत. तर, आरोपी कुणाल जया पवार याच्याविरुद्ध गंभीर स्वरूपाचे दोन गुन्हे दाखल आहेत.
हेही वाचा
आ. लंकेंना शरद पवार गटाकडून ऑफर : खा. अमोल कोल्हे
आ. लंकेंना शरद पवार गटाकडून ऑफर : खा. अमोल कोल्हे
पत्रकार आल्याचे पाहताच ‘आरटीओ’ पथकाचे पलायन!
Latest Marathi News जामखेड गोळीबार प्रकरण : सराईत गुन्हेगार चिंग्या मोरे साथीदारासह गजाआड Brought to You By : Bharat Live News Media.