पीएम मोदींनी घेतली संदेशखाली येथील पीडित महिलांची भेट
Bharat Live News Media ऑनलाईन : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पश्चिम बंगालमधील संदेशखाली येथील पीडित महिलांची भेट घेतली. यावेळी पीडित महिलांनी त्यांची व्यथा पीएम मोदींसमोर मांडली आणि पंतप्रधानांनी वडिलांप्रमाणे त्यांचे म्हणणे ऐकून घेतले. पीएम मोदींनी त्यांच्या व्यथा समजून घेतल्याने पीडित महिला खूप भावूक झाल्या होत्या, अशी माहिती भाजपच्या सुत्रांनी दिली आहे.
उत्तर 24 परगणा जिल्ह्यातील बारासात येथे जाहीर सभेनंतर पंतप्रधान मोदींनी पीडित महिलांची भेट घेतली. यावेळी महिलांनी त्यांच्यावर झालेल्या अत्याचारांबद्दल पंतप्रधानांना सांगितले, अशी माहिती भाजपचे प्रदेश सरचिटणीस अग्निमित्रा पॉल यांनी पीटीआयला फोनवरून दिली.
हेही वाचा
प. बंगाल सरकारला हायकाेर्टाचा दणका, संदेशखाली ‘ईडी’वरील हल्ल्याचा तपास सीबीआयकडे
संदेशखाली प्रकरणी तृणमूलचा नेता शाहजहान शेखला अखेर अटक
Sandeshkhali Violence | अशा घटना घडत असतात, हा राष्ट्रीय चर्चेचा विषय नाही; संदेशखाली हिंसाचार प्रकरणी खर्गेंचे वक्तव्य
Latest Marathi News पीएम मोदींनी घेतली संदेशखाली येथील पीडित महिलांची भेट Brought to You By : Bharat Live News Media.