पणजी : कासारवर्णे अपघातात कळणेची युवती ठार
पेडणे : Bharat Live News Media वृत्तसेवा राज्यातील अपघात सत्र थांबण्याचे नाव घेत नसल्याचे दिसून येत आहे. धारगळ सुकेकुळण येथील अपघातात सिंधुदुर्गचा दुचाकीस्वार ठार झाल्याच्या घटनेला 24 तास उलटण्यापुर्वीच कासारवर्णे येथे दुचाकींच्या अपघातात सुजाता सातार्डेकर (वय २५, रा. कळणे, दोडामार्ग) हिचा जागीच मृत्यू झाला. या अपघातात दुसरा दुचाकीस्वारही गंभीर जखमी झाला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फायझर मास्कारेन्हास हा दुचाकीने (जीए 11-जे-2128) हसापूर मार्गे जात होता. यावेळी समोरून दुचाकीने (एम. एच. 07-एटी-1150) येणार्या सुजाता सातार्डेकर ओव्हरटेक करण्याच्या प्रयत्नांत त्याच्या दुचाकीला धडक दिली. हा अपघात आज (बुधवार) सकाळी 8 वाजता घडला. या अपघातात सुजाता ही जागीच ठार झाली. अपघातात दुसर्या दुचाकीवरील फायझर फ्रान्सिस मास्कारेन्हास (वय 22) हा गंभीर जखमी झाला असून, त्याच्यावर उपचार सुरू आहेत. अपघाताचा पंचनामा मोप पोलिसांकडून करण्यात आला.
सुजाता हिचे वडील आजारी असतात. आई मोलमजुरी करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करते. यातूनच तिने मुलांचे शिक्षण पूर्ण केले. सुजाता ही भावंडात मोठी होती. शिक्षण पूर्ण झाल्याने दोन महिन्यांपूर्वी सुजाता मोप आंतरराष्ट्रीय विमानतळावर कामाला लागली होती. रात्रपाळीचे काम संपवून घरी जाताना हा अपघात झाला. कामावर ये-जा करण्यासाठी एका महिन्यापूर्वी तिने दुचाकी घेतली होती. तिच्या पश्चात आई, वडील, लहान बहिण व भाऊ आहेत.
हेही वाचा :
Chandrayaan-4 : चांद्रयान-४ दोन टप्प्यात प्रक्षेपित होणार; काय असेल यामध्ये खास?
Parle-G | ‘पार्ले-जी की डार्क पार्ले-जी?’; आयकॉनिक बिस्किटच्या चॉकलेट फ्लेवरचा फोटो व्हायरल, ‘मीम्स’चा पाऊस
ओ बुलाती हैं, मगर जाने का नही; फोटो पाठवून करायची घायाळ, ‘तो’ जाळ्यात येताच दोघे करायचे ‘अशी’ शिकार
Latest Marathi News पणजी : कासारवर्णे अपघातात कळणेची युवती ठार Brought to You By : Bharat Live News Media.