आमचं ठरलंय ! शाहू महाराजांच्या मागे ताकदीने उभे राहणार : संभाजीराजेंची लोकसभा निवडणुकीतून माघार

पुढारी ऑनलाईन डेस्क : कोल्हापूर लोकसभा मतदारसंघातून छत्रपती शाहू महाराज यांची काँग्रेसकडून उमेदवारी निश्चित मानली जात आहे. दरम्यान, माजी खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे. आता आमचं ठरलंय, शाहू महाराजांच्या मागे ताकदीने उभे राहायचे, अशी प्रतिक्रिया संभाजीराजे यांनी दिली आहे. ते पत्रकारांशी बोलत होते. Loksabha Election 2024 ते पुढे म्हणाले की, मी … The post आमचं ठरलंय ! शाहू महाराजांच्या मागे ताकदीने उभे राहणार : संभाजीराजेंची लोकसभा निवडणुकीतून माघार appeared first on पुढारी.

आमचं ठरलंय ! शाहू महाराजांच्या मागे ताकदीने उभे राहणार : संभाजीराजेंची लोकसभा निवडणुकीतून माघार

Bharat Live News Media ऑनलाईन डेस्क : कोल्हापूर लोकसभा मतदारसंघातून छत्रपती शाहू महाराज यांची काँग्रेसकडून उमेदवारी निश्चित मानली जात आहे. दरम्यान, माजी खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे. आता आमचं ठरलंय, शाहू महाराजांच्या मागे ताकदीने उभे राहायचे, अशी प्रतिक्रिया संभाजीराजे यांनी दिली आहे. ते पत्रकारांशी बोलत होते. Loksabha Election 2024
ते पुढे म्हणाले की, मी राज्यात कुठेही जाणार नाही. कोल्हापुरात आता कामाला लागचंय, असे ठरलंय. शाहू महाराजांच्या मागे आम्ही ताकदीने उभे राहणार आहे, असे त्यांनी स्पष्ट केले. तसेच आपण स्वत: लोकसभा निवडणुकीतून माघार घेत असल्याचे त्यांनी सांगितले. Loksabha Election 2024
कोल्हापूर लोकसभेच्या जागेवर शाहू महाराज यांनी निवडणूक लढवावी, अशी भूमिका महाविकास आघाडीतील तिन्ही पक्षांची आहे. मात्र, कोणत्या पक्षाच्या तिकिटावर लढवायची, हे त्यांनी ठरवायचे आहे. त्यांनी जे ठरविले असेल ती जागा आघाडी म्हणून त्यांना देण्याचा निर्णय झाला आहे, असे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी मंगळवारी येथे स्पष्ट केले.
कोल्हापूरची जागा शाहू महाराज यांच्यासाठी सोडण्यात आली आहे. ते काँग्रेसच्या तिकिटावर लढतील, असे शिवसेना ठाकरे गटाकडून सोमवारी सांगण्यात आले होते. तसेच त्या बदल्यात सांगलीची जागा ठाकरे गटाला देण्यात येणार असल्याची आघाडीच्या वर्तुळात चर्चा सुरू आहे. याबाबत पटोले यांना प्रश्न विचारला असता ते म्हणाले, कोल्हापूरच्या बदल्यात सांगली ठाकरे गटाला देण्याचा निर्णय अद्याप झालेला नाही.
 
हेही वाचा 

On Maratha Reservation : मराठा समाज मागास असल्याचे सरकारने सिद्ध करावे : संभाजीराजे छत्रपती
Nashik Lok Sabha Elections : …तर छगन भुजबळांविरोधात युवराज संभाजीराजे मैदानात
स्वराज्य पक्ष असताना इतर पक्षात प्रवेश नाही : संभाजीराजे

Latest Marathi News आमचं ठरलंय ! शाहू महाराजांच्या मागे ताकदीने उभे राहणार : संभाजीराजेंची लोकसभा निवडणुकीतून माघार Brought to You By : Bharat Live News Media.