पदपथावरील पार्किंग पादचार्‍यांच्या जीवावर

मुंढवा : पुढारी वृत्तसेवा : बी. टी. कवडे रोड या मुख्य रस्त्याच्या पदपथावर चारचाकी वाहनांचे पार्किंग केले जात आहे. तसेच अनेक ठिकाणी पदपथांवर अतिक्रमणेही झाली असल्याने नागरिकांना मुख्य रस्त्यावरून जीव मुठीत धरून चालावे लागत आहे. रस्ता वाहतुकीसाठी अरुंद असून अपघातांच्या घटना घडत असल्याने पदपथांवरील अतिक्रमणे तातडीने काढवी, तसेच त्यावर पार्क केलेल्या वाहनांवर कारवाई करण्याची मागणी … The post पदपथावरील पार्किंग पादचार्‍यांच्या जीवावर appeared first on पुढारी.

पदपथावरील पार्किंग पादचार्‍यांच्या जीवावर

मुंढवा : पुढारी वृत्तसेवा : बी. टी. कवडे रोड या मुख्य रस्त्याच्या पदपथावर चारचाकी वाहनांचे पार्किंग केले जात आहे. तसेच अनेक ठिकाणी पदपथांवर अतिक्रमणेही झाली असल्याने नागरिकांना मुख्य रस्त्यावरून जीव मुठीत धरून चालावे लागत आहे. रस्ता वाहतुकीसाठी अरुंद असून अपघातांच्या घटना घडत असल्याने पदपथांवरील अतिक्रमणे तातडीने काढवी, तसेच त्यावर पार्क केलेल्या वाहनांवर कारवाई करण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे.
बी. टी. कवडे रोड येथील वात्सल्य शाळेशेजारी असलेल्या पदपथावर दिवस-रात्र चारचाकी वाहनांचे पार्किंग केले जात आहे.
या रस्त्यावर शालेय मुले व नागरिकांची सतत वर्दळ असते. मुळातच अरुंद असलेल्या या रस्त्यावरील पदपथावर चारचाकी वाहने पार्क केली जात असल्याने विद्यार्थ्यांसह नागरिकांना जीव मुठीत धरून मुख्य रस्त्यावरून चालावे लागत आहे.
मुंढव्यातील ताडीगुत्ता चौक ते महात्मा फुले चौक दरम्यानच्या मुख्य रस्त्याच्या पदपथावरही अनेक ठिकाणी अतिक्रमणे झाली आहेत. या ठिकाणी पदपथ असूनही तो वापरता येत नसल्याने पादचार्‍यांची गैरसोय होत आहे. पदपथावरील अतिक्रमणांवर व पार्किंग केलेल्या वाहनांवर कारवाई करण्याची मागणी होत आहे.
हेही वाचा
प्रवाशांची लूट सुरूच ! पॅसेंजर गाड्यांनाही मेल एक्सप्रेसचे भाडे
Kaveri Kapoor Bollywood Debut : शेखर कपूर यांची मुलगी कावेरी कपूर हिचे बॉलिवूड पदार्पण
Crime News : सराइतांकडून दोन पिस्तुले, काडतुसे जप्त
 
The post पदपथावरील पार्किंग पादचार्‍यांच्या जीवावर appeared first on पुढारी.

मुंढवा : पुढारी वृत्तसेवा : बी. टी. कवडे रोड या मुख्य रस्त्याच्या पदपथावर चारचाकी वाहनांचे पार्किंग केले जात आहे. तसेच अनेक ठिकाणी पदपथांवर अतिक्रमणेही झाली असल्याने नागरिकांना मुख्य रस्त्यावरून जीव मुठीत धरून चालावे लागत आहे. रस्ता वाहतुकीसाठी अरुंद असून अपघातांच्या घटना घडत असल्याने पदपथांवरील अतिक्रमणे तातडीने काढवी, तसेच त्यावर पार्क केलेल्या वाहनांवर कारवाई करण्याची मागणी …

The post पदपथावरील पार्किंग पादचार्‍यांच्या जीवावर appeared first on पुढारी.

Go to Source