मुंबई ; Bharat Live News Media वृत्तसेवा महाराष्ट्र भूषण प्रसिद्ध गायिका आशा भोसले यांच्या फोटो बायोग्राफी पुस्तकाचे प्रकाशन आज केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या हस्ते सह्याद्री अतिथी गृहावर करण्यात आले.
प्रसिद्ध छायाचित्रकार गौतम राजाध्यक्ष यांनी आशाताईंच्या टिपलेल्या छायाचित्रांचे मुंबई भाजपा अध्यक्ष आमदार अँड आशिष शेलार यांच्या पुढाकाराने, संकल्पनेतून आणि व्हॅल्युएबल ग्रुप” च्या सहयोगाने “बेस्ट ऑफ आशा” हे पुस्तक प्रकाशित करण्यात आले आहे. आशा भोसले यांच्या विविध भावमुद्रा आणि वेगवेगळ्या छायाचित्रातून त्यांचे जीवन आणि गाणे या पुस्तकातून उलघडण्यात आला आहे. सुमारे 42 विविध छायाचित्रे आणि त्या क्षणाच्या काही आठवणी यांची अत्यंत देखण्या स्वरूपात मांडणी असलेला हा एक मौल्यवान दस्तऐवजच ठरावे अशी पुस्तकाची निर्मिती करण्यात आली आहे.
मुंबई दौऱ्यावर असणाऱ्या केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या हस्ते आणि आशा भोसले यांच्या प्रमुख उपस्थितीत सह्याद्री अतिथी ग्रहावर आज सकाळी या पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले. या कार्यक्रमाला मुंबई भाजप अध्यक्ष ॲड आशिष शेलार त्यांची पत्नी ॲड प्रतिमा शेलार यांच्यासह जनाई भोसले, आनंद भोसले, व्हॅल्युएबल ग्रुपचे अमेय हेटे, अंकित हेटे जीवनगाणीचे प्रसाद महाडकर आणि पुस्तकाच्या डिझायनर नूतन आजगावकर आदी उपस्थितीत होते.
Latest Marathi News “बेस्ट ऑफ आशा भोसले” पुस्तकाचे अमित शहा यांच्या हस्ते प्रकाशन Brought to You By : Bharat Live News Media.
“बेस्ट ऑफ आशा भोसले” पुस्तकाचे अमित शहा यांच्या हस्ते प्रकाशन