धर्मशाळा; वृत्तसंस्था : भारत आणि इंग्लंड (Ind vs Eng) यांच्यातील पाचवा कसोटी सामना हा धर्मशाळा (Dharamsala) येथे खेळवण्यात येणार आहे. ७ मार्चपासून सुरू होणाऱ्या या सामन्यात खेळपट्टी कशी असेल याची सर्वांना उत्सुकता लागून राहिली आहे. इंग्लंड मालिकेत अखेर वेगवान गोलंदाजांना साथ देणारी खेळपट्टी मिळणार म्हणून खूश असेल. मात्र रोहित अन् राहुल द्रविड ही जोडी इंग्रजांना सरप्राईज देऊ शकते. (India vs England, 5th Test)
संबंधित बातम्या :
मुंबईची विक्रमी 48व्यांदा रणजी ट्रॉफी फायनलमध्ये धडक!
‘आयपीएल’च्या सुरूवातीलाच चेन्नईला मोठा धक्का; ‘हा’ दिग्गज खेळाडू दुखापतग्रस्त
जैस्वालच्या निशाण्यावर ‘हे’ 5 ऐतिहासिक विक्रम! जाणून घ्या आकडेवारी
अचानक आलेल्या पावसामुळे हिमाचल प्रदेश क्रिकेट स्टेडियमची खेळपट्टी तपकिरी रंगाची दिसत आहे. सोमवारी स्वच्छ हवामानामुळे क्युरेटर्सला खेळपट्टीवर काम सुरू करता आले. भारतीय संघ व्यवस्थापनाशी सल्लामसलत करून खेळपट्टीचे स्वरूप क्युरेटर ठरवेल.
जगातील सर्वात सुंदर स्टेडियमपैकी एक असलेल्या धर्मशाळा येथे ७ मार्चपासून सुरू होणाऱ्या सामन्यात इंग्लंडला संथ आणि फिरकीला साथ देणाऱ्या खेळपट्टीचा सामना करावा लागू शकतो. सामना पुढे सरकेल तसे फिरकीला साथ देणारी खेळपट्टी भारतासाठी यापूर्वी फायदेशीर ठरली आहे. हैदराबाद कसोटी गमावल्यानंतर अशाच प्रकारच्या खेळपट्ट्यांवर खेळून भारताने मालिकेत ३-१ अशी विजयी आघाडी घेतली. टीम इंडियाने सलग तीन सामने जिंकून अंतिम सामन्यापूर्वीच मालिका जिंकण्यात यश मिळविले. धर्मशाळाची खेळपट्टी वेगवान आणि उसळणारी मानली जाते. परंतु त्याच्या स्वभावाच्या विपरीत येथे फिरकीपटूंचे वर्चस्व दिसून येते. (India vs England, 5th Test)
Ind vs Eng : रिंकू सिंगच्या कसोटी पदार्पणाची चर्चा
भारत आणि इंग्लंड यांच्यातील पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेतील शेवटचा सामना (Ind vs Eng) ७ मार्चपासून धर्मशाळा येथे खेळवला जाणार आहे. या मालिकेत अनेक युवा खेळाडूंना संधी देण्यात आली आहे. रजत पाटीदार, सर्फराज खान, ध्रुव जुरेल, आकाश दीप यांनी या मालिकेतून भारतीय संघात पदार्पण केले. आता भारताच्या कसोटी संघाचा सदस्य नसतानाही रिंकू सिंग अचानक धर्मशाळा येथे पोहोचला आहे. त्यामुळे तो पाचव्या कसोटीतून पदार्पण करेल का अशी चर्चा सुरू झाली आहे.
पाचवा सामना खेळण्यासाठी टीम इंडिया ३ मार्चला धर्मशाळा पोहोचली होती. ४ मार्चला विश्रांतीचा दिवस होता. यावेळी रिंकूही भारतीय संघासोबत दिसला. अशा स्थितीत तो पाचव्या कसोटीत भारतासाठी प्लेईंग इलेव्हनमध्ये खेळताना दिसेल, असा अंदाज चाहते बांधू लागले. पण, बीसीसीआयने धर्मशाळा येथे ट्रेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेसाठीच्या फोटोशूटसाठी संभाव्य खेळाडूंना बोलावले होते, ज्यामध्ये रिंकू सिंगने देखील हजेरी लावली होती. त्यामुळे रिंकू जूनमध्ये होणारा ट्रेंटी-२० वर्ल्ड कप खेळताना दिसू शकतो. (Ind vs Eng)
हेही वाचा :
व्वा याला म्हणतात ‘स्पीड’..! ‘मुंबई’च्या शबनिमने टाकला सर्वात वेगवान चेंडू
रिंकू सिंह करणार कसोटी पदार्पण? धर्मशालेत पोहचताच…
केएल राहुलला नक्की झालंय काय? IPL, T20 वर्ल्ड कप खेळण्यावर प्रश्नचिन्ह
Latest Marathi News धर्मशाळामध्ये चालणार ‘फिरकी’ची जादू? इंग्लंडचा होणार भ्रमनिरास Brought to You By : Bharat Live News Media.