व्‍वा याला म्‍हणतात ‘स्‍पीड’..! ‘मुंबई’च्‍या शबनिमने टाकला सर्वात वेगवान चेंडू

पुढारी ऑनलाईन डेस्‍क : महिला क्रिकेट इतिहासातील सर्वात वेगवान चेंडू टाकण्‍याचा विक्रम मुंबई इंडियन्स संघाची गोलंदाज शबनिम इस्माईल हिने केला आहे. तिने 132.1 किलोमीटर प्रतितास वेगाने चेंडू टाकत इतिहास रचला असून, महिला क्रिकेटमध्ये स्पीड मीटरवर ताशी 130 किलोमीटरचा टप्पा मोडण्याची ही पहिलीच वेळ आहे. विशेष म्‍हणजे मूळची दक्षिण आफिक्रेची महिला क्रिकेटपटू शबनिम हिने यापूर्वीचा आपला … The post व्‍वा याला म्‍हणतात ‘स्‍पीड’..! ‘मुंबई’च्‍या शबनिमने टाकला सर्वात वेगवान चेंडू appeared first on पुढारी.
व्‍वा याला म्‍हणतात ‘स्‍पीड’..! ‘मुंबई’च्‍या शबनिमने टाकला सर्वात वेगवान चेंडू

Bharat Live News Media ऑनलाईन डेस्‍क : महिला क्रिकेट इतिहासातील सर्वात वेगवान चेंडू टाकण्‍याचा विक्रम मुंबई इंडियन्स संघाची गोलंदाज शबनिम इस्माईल हिने केला आहे. तिने 132.1 किलोमीटर प्रतितास वेगाने चेंडू टाकत इतिहास रचला असून, महिला क्रिकेटमध्ये स्पीड मीटरवर ताशी 130 किलोमीटरचा टप्पा मोडण्याची ही पहिलीच वेळ आहे. विशेष म्‍हणजे मूळची दक्षिण आफिक्रेची महिला क्रिकेटपटू शबनिम हिने यापूर्वीचा आपला सर्वात वेगवान चेंडू टाकण्‍याचा विक्रम मोडित काढला आहे. ( Shabnim Ismail Bowls The Fastest Delivery In Women’s Cricket In WPL 2024 )
महिला ‘आयपीएल’मध्‍ये मंगळवार, ५ मार्च रोजी मुंबई इंडियन्‍स आणि दिल्‍ली कॅपिटल्‍स सामना झाला. या सामन्‍यात दिल्‍लीच्‍या डावातील तिसर्‍या षटकातील दुसर्‍या चेंडू शबनिम हिने ताशी १३२.१ किलोमीटर वेगाने फेकला. हा चेंडू दिल्लीची कर्णधार मेग लॅनिंगच्‍या पॅडला लागला. मुंबई संघाने पायचीतसाठी आवाहन केले; पण पंचांनी ते फेटाळले. मात्र हा चेंडू सर्वात वेगवान ठरला. या चेंडूचा वेग 132.1 किलोमीटर प्रतितास (82.08 mph) नोंदवला गेला.
Shabnim Ismail स्‍वत:चाच विक्रम मोडला

शबनिमने महिला क्रिकेटमधील सर्वात वेगवान चेंडूचा स्वतःचा विक्रम मोडला आहे. यापूर्वी तिने १२८ किमी प्रतितासवेगाने चेंडू टाकला होता. 2016 मध्ये वेस्ट इंडिजविरुद्ध 128 kmph (79.54 mph) आणि 2022 मधील महिला एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेत दोनदा 127 kmph वेगाने गोलंदाजी केली ोती. इस्माईलने 16 वर्षांच्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीत दक्षिण आफ्रिकेसाठी 127 वनडे, 113 टी-20 आणि एक कसोटी सामने खेळले. ( Shabnim Ismail Bowls The Fastest Delivery In Women’s Cricket In WPL 2024 )
आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 317 बळी
महिला क्रिकेटमधील दक्षिण आफ्रिकेची वेगवान गोलंदाज शबनिम हिने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्‍ये आतापर्यंत 317 विकेट्स घेतल्या आहेत. यामध्‍ये वन-डेत 191 आणि टी-20मध्ये 123 विकेट्सचा समावेश आहे. मागील आठपैकी सर्व आठ आयसीसी महिला T20 विश्वचषकांमध्ये ती दक्षिण आफ्रिकेकडून खेळली आहे. गेल्या वर्षी मायदेशात झालेल्या T20 विश्वचषक स्पर्धेनंतर त्याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली आहे. ( Shabnim Ismail Bowls The Fastest Delivery In Women’s Cricket In WPL 2024 )
पुरुष क्रिकेटमधील सर्वात वेगवान चेंडू शोएब अख्‍तरच्‍या नावावर
पुरुष क्रिकेटमध्ये आतापर्यंतचा सर्वात वेगवान चेंडू पाकिस्तानच्या शोएब अख्तरने टाकला होता. त्याने 161.3 किलोमीटर प्रतितास (100.14 mph) वेग गाठला होता.

हेही वाचा :IPL 2024 Schedule Announcement : आयपीएलचे वेळापत्रक जाहीर! सीएसके विरुद्ध आरसीबी यांच्यात पहिली लढत
IPL 2024 पूर्वी गुजरात टायटन्सला मोठा धक्का, संपूर्ण हंगामातून ‘हा’ खेळाडू बाहेर

Latest Marathi News व्‍वा याला म्‍हणतात ‘स्‍पीड’..! ‘मुंबई’च्‍या शबनिमने टाकला सर्वात वेगवान चेंडू Brought to You By : Bharat Live News Media.