सीएनजी २.५० रुपयांनी स्वस्त, आजपासून नवे दर लागू
मुंबई : Bharat Live News Media वृत्तसेवा, महानगर गॅस लिमिटेडने गॅस इनपूट कॉस्ट कमी झाल्यामुळे सीएनजीच्या दरात २ रुपये ५० पैशांची कपात केली असून आता प्रतिकिलो सीएनजीकरिता ७३ रुपये ५० पैसे दर आकारण्यात येईल. नवीन दर बुधवारी ६ मार्चपासून लागू होत आहेत. (CNG Price)
मुंबईतील महानगर गॅस लिमिटेडच्या ग्राहकांना हा फार मोठा दिलासा होय. पेट्रोलवरील खर्चाच्या तुलनेत ५३ टक्के तर डिझेलवरील खर्चाच्या तुलनेत सीएनजी वाहनचालकांची २२ टक्के बचत होत असल्याचे महानगर गॅसने म्हटले आहे. मुंबईत सीएनजी ७६ रुपये प्रतिकिलो मिळत होता. यापूर्वी २ ऑक्टोबर २०२३ रोजी सीएनजी आणि पीएनजीच्या दरात अनुक्रमे ३ आणि २ रुपयांची कपात केली होती. त्यानंतरची ही मोठी कपात होय. (CNG Price)
हे ही वाचा :
पंतप्रधान मोदी आज देशातील पहिल्या अंडरवॉटर मेट्रोचे उद्घाटन करणार
कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांसह कॅबिनेट मंत्र्यांना धमकीचे मेल
सोने दराने गाठला विक्रमी उच्चांक! चांदीही महागली
Latest Marathi News सीएनजी २.५० रुपयांनी स्वस्त, आजपासून नवे दर लागू Brought to You By : Bharat Live News Media.