जळगाव : युवासंवादामधून भाजपनं मांडलं भविष्यासाठी व्हिजन

जळगाव : नरेंद्र पाटील केंद्रीय मंत्री अमित शाह हे जळगाव जिल्ह्याच्या दोन दिवसीय दौऱ्यावर आहेत. त्यांनी युवा संमेलनाच्या माध्यमातून हजारो तरुणांशी संवाद साधला. या युवा संवादामध्ये युवक व युवती मोठ्या प्रमाणात उपस्थित हाेते. शाह यांच्या आगमनापूर्वी युवा मतदरांनी रामनामाचा जयघोष केला. विकसित भारत बनविण्यासाठी युवांनी पुन्हा मोदींना निवडून द्यावे, युवकांच्या भविष्यासाठी हे मतदान असून त्यांच्या … The post जळगाव : युवासंवादामधून भाजपनं मांडलं भविष्यासाठी व्हिजन appeared first on पुढारी.

जळगाव : युवासंवादामधून भाजपनं मांडलं भविष्यासाठी व्हिजन

जळगाव : नरेंद्र पाटील
केंद्रीय मंत्री अमित शाह हे जळगाव जिल्ह्याच्या दोन दिवसीय दौऱ्यावर आहेत. त्यांनी युवा संमेलनाच्या माध्यमातून हजारो तरुणांशी संवाद साधला. या युवा संवादामध्ये युवक व युवती मोठ्या प्रमाणात उपस्थित हाेते. शाह यांच्या आगमनापूर्वी युवा मतदरांनी रामनामाचा जयघोष केला. विकसित भारत बनविण्यासाठी युवांनी पुन्हा मोदींना निवडून द्यावे, युवकांच्या भविष्यासाठी हे मतदान असून त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी मतदान असल्याचे शाह यांनी संवादातून सांगितले.
भाजपाच्या कार्यक्रमात शिस्तबद्धता दिसून आली. जळगाव मध्ये झालेल्या युवा संवादामध्ये विद्यमान आमदार, खासदार नेते जळगाव, धुळे, नंदुरबार येथून आलेले होते. व्यासपीठावर छत्रपती शिवाजी महाराज व स्वामी विवेकानंद यांचे मोठे होर्डिंग लावण्यात आलेले होते. छत्रपती शिवाजी महाराजांकडून स्वाभिमान व देशभक्तीचे विचार युवकांपर्यंत पोहचविण्यात आले. स्वामी विवेकानंद युवकांनी कशाप्रकारे देशभक्ती करावी हे दाखवण्याचा प्रयत्न भाजपाने केला. तर कार्यक्रमाच्या सुरुवातीला तुतारी न वाजवता महाराष्ट्र गीत व ढोलचा गजर ऐकायला मिळाला.
युवासंवादामधून प्रत्येक युवापर्यंत भाजपाचे विचार पोहचायला हवेत यासाठी विस्तीर्ण जागेवर जवळजवळ १२ सभामंडप लावून मोठे स्क्रीन लावण्यात आले होते. या स्क्रीनच्या माध्यमातून अमित शाह यांनी युवकांसोबत थेट संवाद साधला. २०४५ चे व्हीजन ठेवून भाजपाचा अजेंडा युवासंवादामध्ये पूर्ण झालेला दिसून आला. मात्र आगामी निवडणूकीत नवमतदार युवक-युवतींचे मतदान कोणाच्या पारड्यात जाणार हे पाहणे महत्त्वाचे आहे
Latest Marathi News जळगाव : युवासंवादामधून भाजपनं मांडलं भविष्यासाठी व्हिजन Brought to You By : Bharat Live News Media.