‘त्या’ देशांमध्ये पेट्रोलपेक्षाही पाणी महाग!

सॅन जोस-कोस्टारिका : पाण्याशिवाय जीवन नाही, हे सर्वश्रुत आहे. जगण्यासाठी पाणी महत्त्वाची भूमिका बजावते. एखाद-दुसरा दिवस पाण्याशिवाय काढावा लागला तरी किती ससेहोलपट होते, याचा अनुभव जवळपास प्रत्येकाने घेतलेला असतो. आता आपल्याकडे पाण्याचा साठा मुबलक आहे आणि पेट्रोल त्या तुलनेत महागडे आहे. काही देश मात्र असेही आहेत, जेथे पेट्रोलपेक्षाही पाणी महागडे ठरत आले आहे. जगभरात असे … The post ‘त्या’ देशांमध्ये पेट्रोलपेक्षाही पाणी महाग! appeared first on पुढारी.

‘त्या’ देशांमध्ये पेट्रोलपेक्षाही पाणी महाग!

सॅन जोस-कोस्टारिका : पाण्याशिवाय जीवन नाही, हे सर्वश्रुत आहे. जगण्यासाठी पाणी महत्त्वाची भूमिका बजावते. एखाद-दुसरा दिवस पाण्याशिवाय काढावा लागला तरी किती ससेहोलपट होते, याचा अनुभव जवळपास प्रत्येकाने घेतलेला असतो. आता आपल्याकडे पाण्याचा साठा मुबलक आहे आणि पेट्रोल त्या तुलनेत महागडे आहे. काही देश मात्र असेही आहेत, जेथे पेट्रोलपेक्षाही पाणी महागडे ठरत आले आहे.
जगभरात असे अनेक देश आहेत, जिथे पाण्याचे संकट रोज सत्त्वपरीक्षा पाहात असते. पाण्याच्या कमतरतेमुळे तेथील लोकांना अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. भारतात एक लिटर पाण्याची बाटली साधारणपणे 20 रुपयांपर्यंत येते. नॉर्वेमध्ये मात्र एक पाण्याच्या बाटलीसाठी 173 रुपये मोजावे लागतात. अमेरिकेत एका पाण्याच्या बाटलीसाठी 156 रुपये मोजावे लागतात तर ऑस्ट्रेलियामध्ये 139 रुपयांपर्यंत पाण्याची बाटली मिळते. याशिवाय फिनलंडमध्ये पाण्याची एक बाटली 137 रुपयांना मिळते. जगातील सर्वाधिक महागडे पाणी कोस्टारिकामध्ये मिळते. या ठिकाणी एक लिटर पाण्यासाठी चक्क 175 रुपये मोजावे लागतात.
Latest Marathi News ‘त्या’ देशांमध्ये पेट्रोलपेक्षाही पाणी महाग! Brought to You By : Bharat Live News Media.