राहुल नार्वेकरांचा ई-मेल हॅक, हॅकर्सनी राज्यपालांना पाठविला ई-मेल

मुंबई : पुढारी वृत्तसेवा, विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांचा ई- मेल आयडी हॅक करण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. तसेच हॅकर्सनी नार्वेकरांच्या ई-मेल आयडीवरून राज्यपाल रमेश बैस यांना ई-मेल पाठविला आहे. ज्यात विधानसभेत काम न करणाऱ्या आमदारांवर कारवाई करण्याची विनंती केल्याचे उघड झाले आहे. थेट विधानसभा अध्यक्षांचा ई-मेल आयडी हॅक झाल्याने विधिमंडळाच्या सायबर सुरक्षेवर प्रश्नचिन्ह … The post राहुल नार्वेकरांचा ई-मेल हॅक, हॅकर्सनी राज्यपालांना पाठविला ई-मेल appeared first on पुढारी.

राहुल नार्वेकरांचा ई-मेल हॅक, हॅकर्सनी राज्यपालांना पाठविला ई-मेल

मुंबई : Bharat Live News Media वृत्तसेवा, विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांचा ई- मेल आयडी हॅक करण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. तसेच हॅकर्सनी नार्वेकरांच्या ई-मेल आयडीवरून राज्यपाल रमेश बैस यांना ई-मेल पाठविला आहे. ज्यात विधानसभेत काम न करणाऱ्या आमदारांवर कारवाई करण्याची विनंती केल्याचे उघड झाले आहे. थेट विधानसभा अध्यक्षांचा ई-मेल आयडी हॅक झाल्याने विधिमंडळाच्या सायबर सुरक्षेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहेत. (Rahul Narwekar’s email hacked)
विधानसभा अध्यक्ष नार्वेकर यांच्या ई-मेल आयडीवरून सोमवारी राज्यपाल बैस यांना एक मेल आला. त्यात विधानसभेत नीट काम न करणाऱ्या आमदारांवर कारवाई करावी, अशी मागणी करण्यात आली. मात्र, यासंदर्भात राजभवनातून विधानसभा अध्यक्षांकडे खातरजमा करण्यात आली. त्यावर असा कोणताच ई-मेल आपण पाठविला नसल्याचे विधानसभा अध्यक्षांकडून सांगण्यात आले आणि हॅकिंगचा प्रकार उघडकीस आला. त्यानंतर विधानसभा अध्यक्षांकडून मरिन ड्राईव्ह पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे. सायबर सेल या प्रकरणाचा तपास करत आहे. (Rahul Narwekar’s email hacked)
नार्वेकर यांच्या तक्रारीवरून अज्ञात व्यक्तींविरुद्ध भारतीय दंड संहितेच्या (IPC) अनेक कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी चौकशी सुरू करण्यात आली आहे.
हे ही वाचा :

Lok Sabha Elections 2024 : कोल्हापूरची जागा शाहू महाराजांसाठी
महाविकास आघाडीची आज निर्णायक बैठक
अमित शहांची रात्री उशिरापर्यंत खलबते

 
Latest Marathi News राहुल नार्वेकरांचा ई-मेल हॅक, हॅकर्सनी राज्यपालांना पाठविला ई-मेल Brought to You By : Bharat Live News Media.