सुवर्णांकित लघुग्रह

वॉशिंग्टन : नासाने एक यान 16 सायकी या खास लघुग्रहावर पाठवले आहे. हा लघुग्रह सोन्याचा बनलेला असल्याचे सांगितले जाते. याशिवाय त्यात अत्यंत मौल्यवान धातूंचा खजिनाही दडलेला आहे, असा संशोधकांचा अंदाज आहे. सायकी या लघुग्रहाचा शोध इटालियन खगोलशास्त्रज्ञ अ‍ॅनिबेल डी गॅस्पॅरिस यांनी लावला होता. त्या वेळेस शोधलेला हा 16वा लघुग्रह होता, म्हणून त्याला 16 सायकी या … The post सुवर्णांकित लघुग्रह appeared first on पुढारी.

सुवर्णांकित लघुग्रह

वॉशिंग्टन : नासाने एक यान 16 सायकी या खास लघुग्रहावर पाठवले आहे. हा लघुग्रह सोन्याचा बनलेला असल्याचे सांगितले जाते. याशिवाय त्यात अत्यंत मौल्यवान धातूंचा खजिनाही दडलेला आहे, असा संशोधकांचा अंदाज आहे. सायकी या लघुग्रहाचा शोध इटालियन खगोलशास्त्रज्ञ अ‍ॅनिबेल डी गॅस्पॅरिस यांनी लावला होता. त्या वेळेस शोधलेला हा 16वा लघुग्रह होता, म्हणून त्याला 16 सायकी या नावाने ओळखले जाते.
प्राचीन ग्रीक मिथकातल्या आत्म्याच्या देवीच्या नावावरून हे नाव देण्यात आले असल्याचे मानले जाते. या लघुग्रहाची रचना बटाट्यासारखी असून त्यात लोह, सोने, प्लॅटिनम, निकेल या मौल्यवान धातूंचा समावेश आहे. सायकी लघुग्रह पृथ्वीपासून 50 लाख किलोमीटर अंतरावर आहे. तिथे प्रकाश पोहोचण्यासाठी देखील 31 मिनिटे लागतात. सायकीच्या पृष्ठभागाचे क्षेत्रफळ सुमारे 165,800 चौरस किलोमीटर आहे. ते तामिळनाडू राज्यापेक्षा सुमारे 35 हजार चौरस किलोमीटर जास्त आहे.
लघुग्रहांमध्ये कार्बन, पाणी आणि इतर घटक असतात. ते सूर्यमालेत ग्रह तयार बनताना तयार झालेले असतात. यामध्ये धातू नसतात. त्यामुळे अशा लघुग्रहांमधला धातू कुठून आला, याबद्दलच्या तपासातून अनेक रहस्यं उघड होतील. नासाच्या मते, सायकी कदाचित खडक आणि धातूच्या मिश्रणाने बनला असावा. त्यात धातूचं प्रमाण 30 ते 60 टक्के आहे. या लघुग्रहावरून सोनं कधी पृथ्वीवर आणता येईल का, असा विचार मात्र फक्त कल्पनेतच होऊ शकतो, हे देखील जवळपास स्पष्ट आहे.
Latest Marathi News सुवर्णांकित लघुग्रह Brought to You By : Bharat Live News Media.