धक्कादायक! अधिकार्‍याच्या ड्रॉव्हरमध्ये लाखांचे बंडल : लाचखोरीचा पर्दाफाश

पुणे : पुढारी वृत्तसेवा : महापालिकेतील एका अधिकार्‍याच्या टेबल ड्रॉव्हरमध्ये जवळपास दोन ते तीन लाख रुपयांची रक्कम असलेल्या नोटांचे बंडल सापडले. ‘आप’च्या कार्यकर्त्यांनी हा प्रकार उजेडात आणल्यावर संबंधित अधिकार्‍याने उडवाउडवीची उत्तरे देत त्यावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला. या घटनेने मात्र पालिकेतील लाचखोरीचा पर्दाफाश झाला आहे. महापालिकेत लाचलुचपत विभागाने लाच घेताना अधिकारी, कर्मचार्‍यांना थेट रंगेहाथ पकडण्याच्या … The post धक्कादायक! अधिकार्‍याच्या ड्रॉव्हरमध्ये लाखांचे बंडल : लाचखोरीचा पर्दाफाश appeared first on पुढारी.

धक्कादायक! अधिकार्‍याच्या ड्रॉव्हरमध्ये लाखांचे बंडल : लाचखोरीचा पर्दाफाश

पुणे : Bharat Live News Media वृत्तसेवा : महापालिकेतील एका अधिकार्‍याच्या टेबल ड्रॉव्हरमध्ये जवळपास दोन ते तीन लाख रुपयांची रक्कम असलेल्या नोटांचे बंडल सापडले. ‘आप’च्या कार्यकर्त्यांनी हा प्रकार उजेडात आणल्यावर संबंधित अधिकार्‍याने उडवाउडवीची उत्तरे देत त्यावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला. या घटनेने मात्र पालिकेतील लाचखोरीचा पर्दाफाश झाला आहे. महापालिकेत लाचलुचपत विभागाने लाच घेताना अधिकारी, कर्मचार्‍यांना थेट रंगेहाथ पकडण्याच्या घटना घडल्या आहेत. मात्र, मंगळवारी (दि.5) थेट कामानिमित्त आलेल्या कार्यकर्त्यांनीच अधिकार्‍यांना रंगेहाथ पकडल्याचा धक्कादायक प्रकार घडला.
पथ विभागातील एका अधीक्षक अभियंत्याच्या कार्यालयात ही घटना घडली. आम आदमी पक्षाचे पिंपरी-चिंचवड शहरातील युवकचे कार्यकर्ते रविराज काळे हे बाणेरमधील एक तक्रार घेऊन पथ विभागाच्या अधीक्षक अभियंत्याकडे आले होते. त्या वेळेस या कार्यालयातील एका कनिष्ठ अभियंत्याला एका ठेकेदाराने नोटांचे बंडल असलेले बंद पाकीट दिल्याचे काळे यांनी पाहिले. या अभियंत्याने हे पाकीट टेबलच्या ड्रॉव्हरमध्ये ठेवून दिले. हा प्रकार पाहिल्यानंतर काळे व त्यांच्या सहकार्‍यांनी संबंधित अभियंत्याला विचारणा केली, त्यावर या अभियंत्याने एका ठेकेदाराने हे पैसे थोड्या वेळासाठी आपल्याकडे ठेवायला दिले असल्याची उडवाउडवीची उत्तरे दिली. मात्र, काळे यांनी ड्रॉव्हरमधून ते पाकीट बाहेर काढले, ते फोडल्यानंतर त्यात दोन ते तीन लाखांची रक्कम असल्याचे दिसून आले. संबंधित अभियंत्याला त्याबाबत व्यवस्थित उत्तरे देता न आल्याने काळे हे संबंधित अधीक्षक अभियंत्याकडे गेले. त्यांना याबाबत समाधानकारक उत्तरे देता आली नसल्याचे काळे यांनी दैनिक ‘Bharat Live News Media’च्या प्रतिनिधीशी बोलताना सांगितले.
‘आप’च्या कार्यकर्त्यांकडून लाचखोरीचा पर्दाफाश
अभियंता अन् बंडल दोन्ही गायब
या प्रकारानंतर काळे हे अधीक्षक अभियंत्याला या प्रकाराबाबत माहिती देण्यासाठी गेले असता, संबंधित अभियंता आणि त्याकडील नोटांचे बंडल हे दोन्हीही गायब झाले. ती रक्कम एका मोठ्या ठेकेदाराकडून देण्यात आल्याचे समजते. मात्र, हा प्रकार घडल्यानंतर ती रक्कम नक्की कुठे गायब झाली, हे मात्र समजू शकले नाही.
महापालिकेत चर्चा ‘लाचलुचपत’च्या सापळ्याची
सायंकाळी चार वाजण्याच्या सुमारास ही घटना घडल्यानंतर महापालिकेत लाचलुचपत विभागाने सापळा
रचून कारवाई केल्याची चर्चा सुरू होती. प्रत्यक्षात मात्र ‘आप’च्या कार्यकर्त्यांनी लाचखोरीचा पर्दाफाश केला असल्याचे सायंकाळी स्पष्ट झाले.
व्हायरल व्हिडीओने सत्य उजेडात
संबंधित अभियंत्याला विचारणा केली असता, त्याने एका ठेकेदाराने आपल्या टेबलावर पैसे आणून टाकले होते. मी ते घेतले नाहीत. पैसे टाकून मला अडकविण्याचा प्रयत्न होता, असे सांगितले. प्रत्यक्षात मात्र या घटनेचा जो व्हिडीओ व्हायरल झाला, त्यात या अभियंत्याने त्याच्या ड्रॉव्हरमध्ये हे पैसे ठेवले होते. ‘आप’च्या कार्यकर्त्यांनी ते बाहेर काढल्यानंतर अभियत्याने ते पुन्हा ड्रॉव्हरमध्ये ठेवण्याचा प्रयत्न केला असल्याचे दिसून येत आहे.
अभियंत्याच्या टेबलाच्या ड्रॉव्हरमध्ये पैसे सापडल्याचा प्रकार गंभीर आहे, याप्रकरणी चौकशी करून संबंधितांवर कारवाई केली जाईल.
– विक्रम कुमार, आयुक्त, महापालिका, पुणे

हेही वाचा

रेशन दुकानांवर 4-जी ई-पॉसची सुविधा
Lok Sabha Elections 2024 : कोल्हापूरची जागा शाहू महाराजांसाठी
अमित शहांची रात्री उशिरापर्यंत खलबते

Latest Marathi News धक्कादायक! अधिकार्‍याच्या ड्रॉव्हरमध्ये लाखांचे बंडल : लाचखोरीचा पर्दाफाश Brought to You By : Bharat Live News Media.