डमी अडत्यांना दणका; नऊ जणांकडून 19 हजार 470 रुपयांचा दंड वसूल

पुणे : पुढारी वृत्तसेवा : पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीच्या गुलटेकडी मार्केट यार्डात शेतकर्‍याला डमी अडत्याने मारहाण केल्यानंतर बाजार समितीने आक्रमक भूमिका घेत मंगळवार (दि.5) पासून बेकायदा डमी अडत्यांवर कारवाईचा बडगा उगारत दणका दिला आहे. कारवाईच्या पहिल्या दिवशी नऊ जणांवर कारवाई करत 19 हजार 470 रुपयांचा दंड वसूल केला. यामध्ये बाजार समितीचे विद्यमान संचालक गणेश … The post डमी अडत्यांना दणका; नऊ जणांकडून 19 हजार 470 रुपयांचा दंड वसूल appeared first on पुढारी.

डमी अडत्यांना दणका; नऊ जणांकडून 19 हजार 470 रुपयांचा दंड वसूल

पुणे : Bharat Live News Media वृत्तसेवा : पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीच्या गुलटेकडी मार्केट यार्डात शेतकर्‍याला डमी अडत्याने मारहाण केल्यानंतर बाजार समितीने आक्रमक भूमिका घेत मंगळवार (दि.5) पासून बेकायदा डमी अडत्यांवर कारवाईचा बडगा उगारत दणका दिला आहे. कारवाईच्या पहिल्या दिवशी नऊ जणांवर कारवाई करत 19 हजार 470 रुपयांचा दंड वसूल केला. यामध्ये बाजार समितीचे विद्यमान संचालक गणेश घुले व अनिरुद्ध ऊर्फ बापू भोसले यांच्या गाळ्यावरही कारवाई करण्यात आली आहे, असे प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले. बाजार समितीतील फळबाजारात एका बेकायदा डमी अडत्याने शेतकर्‍याला कानशिलात लगावत लाथा घातल्या होत्या.
शेतकरी मारहाण प्रकरणानंतर बाजार समितीचे सभापती आणि सचिव यांनी सोमवारी (दि. 4) पत्रकार परिषद घेऊन गाळ्यावरील बेकायदा डमी अडते आणि गाळ्यासमोरील 15 फुटांच्या बाहेरील वापर करणार्‍या जागांवर देखील कारवाई करण्याची घोषणा केली होती. त्यानुसार बाजार समितीचे फळे व तरकारी विभागाचे प्रमुख बाळासाहेब कोंडे यांनी मंगळवारी कारवाईची मोहीम हाती घेतली. बाजारातील अडते व व्यापारी गटातील गणेश घुले आणि अनिरुद्ध भोसले या दोन्ही संचालकांच्या गाळ्यांवर डमींची संख्या जास्त असून, गेट नंबर एक आणि गेट नंबर तीनवर रस्त्यावर व्यापार करून वाहतुकीला अडथळा होतो. मात्र, या दोन्ही संचालकांकडून कारवाई होत नव्हती. त्यामुळे बाजारातील अडते प्रशासनाला जुमानत नव्हते. मात्र, या दोन्ही संचालकांवर कारवाई केली जाणार असल्याचे सभापती दिलीप काळभोर यांनी पत्रकार परिषदेत स्पष्ट केले होते.
हेही वाचा

Weather Update : गार वार्‍यांमुळे राज्यात पारा घसरला
अमित शहांची रात्री उशिरापर्यंत खलबते
‘भारतीयांबद्दल तक्रार नाही, गुन्हेगार दोषी’, अत्याचार पीडित स्पॅनिश महिलेचा खुलासा

Latest Marathi News डमी अडत्यांना दणका; नऊ जणांकडून 19 हजार 470 रुपयांचा दंड वसूल Brought to You By : Bharat Live News Media.