हिंगोली : औंढा नागनाथ येथील पर्यटन निवास परिसरातील अतिक्रमण हटविले

औंढा नागनाथ; पुढारी वृत्तसेवा : औंढा नागनाथ येथील पर्यटन निवास परिसरातील रिकाम्या जागेत गेल्या अनेक दिवसांपासून अतिक्रमण सुरू आहे. येथील अतिक्रमण यापूर्वीही अनेकदा हटवण्यात आले, पण अतिक्रमण हटविल्यानंतर पुन्हा त्याच जागेवर काही व्यवसायिकांनी अतिक्रमण केले आहे. औंढा नगरपंचायतीकडून आज (दि.५) पोलिस बंदोबस्तात हे अतिक्रमण हटविण्यात आले. औंढा नागनाथ येथील पर्यटन निवास परिसरात रिकाम्या जागेत काही … The post हिंगोली : औंढा नागनाथ येथील पर्यटन निवास परिसरातील अतिक्रमण हटविले appeared first on पुढारी.

हिंगोली : औंढा नागनाथ येथील पर्यटन निवास परिसरातील अतिक्रमण हटविले

औंढा नागनाथ; Bharat Live News Media वृत्तसेवा : औंढा नागनाथ येथील पर्यटन निवास परिसरातील रिकाम्या जागेत गेल्या अनेक दिवसांपासून अतिक्रमण सुरू आहे. येथील अतिक्रमण यापूर्वीही अनेकदा हटवण्यात आले, पण अतिक्रमण हटविल्यानंतर पुन्हा त्याच जागेवर काही व्यवसायिकांनी अतिक्रमण केले आहे. औंढा नगरपंचायतीकडून आज (दि.५) पोलिस बंदोबस्तात हे अतिक्रमण हटविण्यात आले.
औंढा नागनाथ येथील पर्यटन निवास परिसरात रिकाम्या जागेत काही व्यवसायिक उघड्यावर चिकन व मासे विक्री करीत होते. यासह आणखी काही दुकानेही अतिक्रमण करून स्थायिक झाली होती. याचा परिसरातील नागरिकांना  नाहक त्रास सहन करावा लागत होता. यामुळे हे अतिक्रमण हटवावे, अशी मागणी औंढा नागनाथ नगरपंचायत कार्यालयाकडे परिसरातील नागरिकांनी केली. औंढा नगरपंचायतीकडून ही अतिक्रमणे तीन ते चार वेळा हटविण्यात आली, परंतु परत या व्यवसायिकांनी याच जागेवर आपले बस्तान बसविले.
काही दिवसांपूर्वी औंढा नगरपंचायतीकडून या व्यवसायिकांना दुसरीकडे जागा उपलब्ध करून देण्यात आली होती. परंतु पर्यटन निवास  परिसरात सतत वर्दळ असल्यामुळे व्यवसायिकांनी परत अतिक्रमण करीत याठिकाणी आपला व्यवसाय सुरू केला. नागरिकांच्या सततच्या तक्रारीमुळे आज औंढा नगरपंचायतीकडून पोलीस बंदोबस्तात हे अतिक्रमण हटविण्यात आले.
हेही वाचा :

BJP Rally in Jalgaon : पवार-ठाकरे कुटुंबांकडून केवळ घराणेशाहीचे राजकारण : अमित शहांचा हल्‍लाबाेल
सैतानी कृत्य | ‘त्या’ दिवशी हमासचा इस्रायली महिलांवर बलात्कार : UNचा अहवाल
पाणी कमी प्यायल्याने होतो ‘हा’ धोका, जाणून घ्या सिस्टायटिस लक्षणे व उपाय

Latest Marathi News हिंगोली : औंढा नागनाथ येथील पर्यटन निवास परिसरातील अतिक्रमण हटविले Brought to You By : Bharat Live News Media.