तेजस्विनी पंडित साजिद नाडियाडवालासोबत करणार काम

पुढारी ऑनलाईन डेस्क : मराठी सिनेसृष्टीत स्वतःची एक वेगळी ओळख निर्माण करणाऱ्या तेजस्विनी पंडित (Tejaswni Pandit) हिने आपल्या सर्वोत्कृष्ट अभिनयाने प्रेक्षकांना आपलेसे केले. विविधांगी भूमिका साकारणाऱ्या या अभिनेत्रीने अभिनयासोबतच निर्मित क्षेत्रातही प्रवेश केला आणि आता तेजस्विनी लवकरच आपल्यासमोर एक नवी कलाकृती घेऊन येणार आहे. (Tejaswni Pandit) यासाठी तिने बॉलिवूडला अनेक दर्जेदार चित्रपट देणाऱ्या साजिद नाडियाडवाला … The post तेजस्विनी पंडित साजिद नाडियाडवालासोबत करणार काम appeared first on पुढारी.

तेजस्विनी पंडित साजिद नाडियाडवालासोबत करणार काम

Bharat Live News Media ऑनलाईन डेस्क : मराठी सिनेसृष्टीत स्वतःची एक वेगळी ओळख निर्माण करणाऱ्या तेजस्विनी पंडित (Tejaswni Pandit) हिने आपल्या सर्वोत्कृष्ट अभिनयाने प्रेक्षकांना आपलेसे केले. विविधांगी भूमिका साकारणाऱ्या या अभिनेत्रीने अभिनयासोबतच निर्मित क्षेत्रातही प्रवेश केला आणि आता तेजस्विनी लवकरच आपल्यासमोर एक नवी कलाकृती घेऊन येणार आहे. (Tejaswni Pandit) यासाठी तिने बॉलिवूडला अनेक दर्जेदार चित्रपट देणाऱ्या साजिद नाडियाडवाला एंटरटेनमेंटसोबत हातमिळवणी केली आहे. नाडियाडवाला ग्रँडसन एंटरटेंनमेंट, जोफिएल एंटरप्राईज प्रस्तुत, वर्धा नाडियाडवाला, सह्याद्री फिल्म्स यांच्या नेतृत्वाखाली हे चित्रपट प्रदर्शित होणार आहे. या निमित्ताने मराठी सिनेसृष्टीत एक परिवर्तन घडवून आणण्याचा हा प्रयत्न असणार आहे.
या कार्याचा मुख्य हेतू म्हणजे पडद्यावर आपल्या भव्य संस्कृतीचे आणि ऐतिहासिक साहित्याचे प्रतिबिंब दाखवणे हा आहे. हृदयाचा ठाव घेणाऱ्या कथा, श्वास रोखून ठेवणारी दृश्ये आणि इतरांपेक्षा वेगळा आशय दाखवण्यासाठी ही टीम सज्ज झाली आहे.
निर्माती वर्धा नाडियाडवाला म्हणतात, ” मराठी चित्रपटांसाठी सह्याद्री फिल्मसोबत काम करताना आम्हाला खूप आनंद होत आहे. माझे या भूमीशी, संस्कृतीशी आणि भाषेशी विशेष नाते आहे. हे आमचे घर आहे. त्यामुळे हे चित्रपट माझ्यासाठी खूप खास असतील. यात आम्हाला तेजस्विनीची साथ लाभली आहे. तेजस्विनी एक चतुरस्त्र व्यक्तिमत्व आहे. त्यामुळे तिचा दृष्टिकोण खूपच वेगळा असणार, याची आम्हाला जाणीव असून मराठी चित्रपटाबद्दलच्या अंतर्दृष्टीवर आमचा विश्वास आहे. तेजस्विनीसोबत आम्ही आमच्या या नवीन प्रवासाला सुरुवात करत आहोत. तिच्यासोबत आम्ही प्रेक्षकांच्या अपेक्षा पूर्ण करू शकतो आणि यासाठी आम्हाला प्रेक्षकांचे प्रेम आणि सहकार्य गरजेचे आहे.”
तेजस्विनी पंडित म्हणाली, ‘ऐतिहासिकदृष्ट्या मराठी चित्रपट हे प्रतिभावान कलाकार आणि निर्मितीसाठी ओळखले जातात. ज्यांनी आजवर प्रेक्षकांना अनेक अविस्मरणीय आशय दिले आहेत. निर्माते साजिद नाडियाडवाला आणि वर्धा नाडियाडवाला यांच्यासोबत एकत्र येऊन आम्ही नवी कलाकृती आणणार आहोत. हे कार्य ‘गेम चेन्जर’ ठरणारे असेल. ”

 

View this post on Instagram

 
A post shared by Tejaswwini 🕊️🧿 (@tejaswini_pandit)

Latest Marathi News तेजस्विनी पंडित साजिद नाडियाडवालासोबत करणार काम Brought to You By : Bharat Live News Media.