पाकिस्तानात हिमवृष्टी-मुसळधार पावसामुळे 35 नागरिकांचा मृत्यू

पुढारी ऑनलाईन डेस्क : Pakistan Snowfall Heavy Rains : पाकिस्तानच्या खैबर पख्तुनख्वा प्रांतातील विविध भागात हिमवृष्टी आणि मुसळधार पावसामुळे किमान 35 नागरिकांचा मृत्यू झाला असून अनेक जण जखमी झाले आहेत. मृत्यू झालेल्यांमध्ये बावीस मुलांचा समावेश आहे. त्यापैकी अनेकजण भूस्खलनात चिरडले गेल्याचे आपत्ती व्यवस्थापन अधिकाऱ्यांनी सांगितले. पाकिस्तानच्या उत्तरेकडील आणि पश्चिमेकडील अनेक भागांतील रस्ते खचले आहेत आणि … The post पाकिस्तानात हिमवृष्टी-मुसळधार पावसामुळे 35 नागरिकांचा मृत्यू appeared first on पुढारी.

पाकिस्तानात हिमवृष्टी-मुसळधार पावसामुळे 35 नागरिकांचा मृत्यू

Bharat Live News Media ऑनलाईन डेस्क : Pakistan Snowfall Heavy Rains : पाकिस्तानच्या खैबर पख्तुनख्वा प्रांतातील विविध भागात हिमवृष्टी आणि मुसळधार पावसामुळे किमान 35 नागरिकांचा मृत्यू झाला असून अनेक जण जखमी झाले आहेत. मृत्यू झालेल्यांमध्ये बावीस मुलांचा समावेश आहे. त्यापैकी अनेकजण भूस्खलनात चिरडले गेल्याचे आपत्ती व्यवस्थापन अधिकाऱ्यांनी सांगितले. पाकिस्तानच्या उत्तरेकडील आणि पश्चिमेकडील अनेक भागांतील रस्ते खचले आहेत आणि शेकडो घरांचे नुकसान झाल्याचेही त्यांनी सांगितले.

Surprise snowfall and heavy rains claim 35 lives in Pakistan https://t.co/qjop7Vz0ST pic.twitter.com/Ur7huOhlXV
— Voice of Europe 🌍 (@V_of_Europe) March 5, 2024
खैबर पख्तुनख्वा प्रांताच्या उत्तर-पश्चिम भागात गेल्या दोन दिवसांपासून सतत पाऊस पडत आहे. तसेच काही भागांत बर्फवृष्टी होत आहे. काही ठिकाणी तर भूस्खलन झाले आहे. ज्यामुळे रस्ते वाहतूक प्रभावित झाली आहे. सततच्या पावसामुळे अनेक घरांची पडझड झाली आहे. अनेक भागात पूरस्थिती निर्माण झाली आहे.
पाकिस्तानच्या हवामान खात्याचे माजी संचालक मुश्ताक अली शाह यांनी ही आपत्ती हवामान बदलामुळे आल्याचे म्हटले आहे. ‘मार्च महिना आला आहे. साधारणतः मार्चमध्ये गरमी सुरू होते असे मानले जाते. मात्र यावेळी हवामानाने वळण घेतले असून जोरदार पाऊस होताना दिसत आहे,’ असेही त्यांनी सांगितले आहे.
Latest Marathi News पाकिस्तानात हिमवृष्टी-मुसळधार पावसामुळे 35 नागरिकांचा मृत्यू Brought to You By : Bharat Live News Media.