”संत ज्ञानेश्वर उद्यान आंतरराष्ट्रीय दर्जाचे पर्यटनस्थळ विकसित करावे”

मुंबई, पुढारी वृत्तसेवा : पैठण येथील संत ज्ञानेश्वर उद्यानाचा आंतरराष्ट्रीय दर्जाचे पर्यटनस्थळ म्हणून विकास करावा यासाठी निधीची कमतरता भासू देणार नाही, अशी ग्वाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुंबईत दिली. संबंधित बातम्या  धुळे : अंत्योदय शिधापत्रिकाधारक प्रत्येक कुटुंबाला एका साडीचे मोफत वाटप पाणी कमी प्यायल्याने होतो ‘हा’ धोका, जाणून घ्या सिस्टायटिस लक्षणे व उपाय Shahrukh-Ram charan … The post ”संत ज्ञानेश्वर उद्यान आंतरराष्ट्रीय दर्जाचे पर्यटनस्थळ विकसित करावे” appeared first on पुढारी.
”संत ज्ञानेश्वर उद्यान आंतरराष्ट्रीय दर्जाचे पर्यटनस्थळ विकसित करावे”

मुंबई, Bharat Live News Media वृत्तसेवा : पैठण येथील संत ज्ञानेश्वर उद्यानाचा आंतरराष्ट्रीय दर्जाचे पर्यटनस्थळ म्हणून विकास करावा यासाठी निधीची कमतरता भासू देणार नाही, अशी ग्वाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुंबईत दिली.
संबंधित बातम्या 

धुळे : अंत्योदय शिधापत्रिकाधारक प्रत्येक कुटुंबाला एका साडीचे मोफत वाटप

पाणी कमी प्यायल्याने होतो ‘हा’ धोका, जाणून घ्या सिस्टायटिस लक्षणे व उपाय

Shahrukh-Ram charan : ‘इडली वडा राम चरण कहां है तू’ शाहरुखच्या वादग्रस्त कॉमेंटवर मेकअप आर्टिस्टने सोडली पार्टी (Video)

संत ज्ञानेश्वर उद्यान विकसित करण्याबाबत आज मंगळवारी (दि. ५) रोजी मंत्रालयात मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली शिखर समितीची बैठक झाली. यावेळी दुरदृष्यप्रणालीच्या माध्यमातून छत्रपती संभाजीनगरचे पालकमंत्री संदिपान भुमरे सहभागी झाले होते. तर मुख्य सचिव डॉ. नितीन करीर, वित्त विभागाचे अपर मुख्य सचिव ओ. पी. गुप्ता, नियोजन विभागाचे प्रधान सचिव सौरव विजय, पर्यटन विभागाच्या सचिव जयश्री भोज आदी यावेळी उपस्थित होते.
या उद्यानाच्या विकास कामांसाठी मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली नुकतीच उच्चाधिकार समितीची बैठक झाली. त्यामध्ये समितीच्या शिफारशीनुसार, विकास कामांच्या प्रस्तावात सुधारणा करून १४९ कोटी रुपयांचा सुधारित प्रस्ताव करण्यात आला.
पैठण येथील संत ज्ञानेश्वर उद्यान आंतरराष्ट्रीय दर्जाचे पर्यटन स्थळ म्हणून विकसित करण्यासाठी मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली यापूर्वी वेळोवेळी बैठका घेण्यात आल्या आहेत. मराठवाडा मुक्तिसंग्राम दिनी छत्रपती संभाजीनगर येथे झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत संत ज्ञानेश्वर उद्यान पुनर्विकासासाठी १५० कोटीचा निधी देण्याची घोषणा मुख्यमंत्री शिंदे यांनी केली होती.
संत ज्ञानेश्वर उद्यान विकसित व सुशोभित करण्याचा प्रकल्प अहवाल तयार करण्यासाठी जागतिक स्तरावरील सल्लागार निवडीची निविदा प्रक्रिया पूर्ण केली आणि सल्लागाराला कार्यारंभ आदेश देखीलही देण्यात आला आहे. यावेळी उद्यानाच्या सुशोभीकरण आणि पुनर्विकास कामांचे सादरीकरण करण्यात आले.
Latest Marathi News ”संत ज्ञानेश्वर उद्यान आंतरराष्ट्रीय दर्जाचे पर्यटनस्थळ विकसित करावे” Brought to You By : Bharat Live News Media.