
Bharat Live News Media ऑनलाईन डेस्क: भारतातील पहिल्या पाण्याखालील मेट्रो रेल्वे सेवेचे उद्या (दि.५) कोलकाता येथे उद्घाटन होणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते या रेल्वेसेवेचे लोकार्पण करण्यात येणार आहे. या निमित्ताने देशात सर्वात पहिल्यांदा मेट्रो सेवा सुरु करुन इतिहास रचणारे कोलकाता शहर आता पुन्हा एकदा नवीन इतिहास रचणार आहे. (Underwater Metro In Kolkata)
पश्चिम बंगालमध्ये पोहोचल्यानंतर पंतप्रधान मोदी एका कार्यक्रमात ही अत्याधुनिक मेट्रो रेल्वे सेवा देशवासियांना समर्पित करणार आहेत. कोलकात्तामधील पाण्याखालील मेट्रो हुगळी नदीखाली बांधण्यात आली आहे. काही दिवसांपूर्वी रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी कोलकाता मेट्रो रेल्वे सेवांचा आढावा घेतला होता. प्रवाशांसाठी पूर्णपणे तयार असलेली पाण्याखालील मेट्रो रेल्वे बुधवारी (दि.५) पंतप्रधान मोदी उद्घाटन करून देशाला समर्पित करणार आहेत. (Underwater Metro In Kolkata)
मेट्रो रेल्वे नदीखाली बांधलेल्या बोगद्यामधून जाणार, पहिलाच प्रकल्प
फेब्रुवारी 2020 मध्ये तत्कालीन रेल्वे मंत्री पीयूष गोयल यांनी सॉल्ट लेक सेक्टर V आणि सॉल्ट लेक स्टेडियमला जोडणाऱ्या कोलकाता मेट्रोच्या पूर्व-पश्चिम मेट्रो कॉरिडॉरच्या पहिल्या टप्प्याचे उद्घाटन केले होते. 16.5 किमी लांबीचा मेट्रो मार्ग हुगळीच्या पश्चिम किनाऱ्यावरील हावडा आणि पूर्व किनाऱ्यावरील सॉल्ट लेक सिटीला जोडतो. 10.8 किमी भाग भूमिगत आहे. भारतातील अशा प्रकारचा हा पहिलाच वाहतूक प्रकल्प आहे, ज्यामध्ये मेट्रो रेल्वे नदीखाली बांधलेल्या बोगद्यामधून जाणार आहे. (Underwater Metro In Kolkata)
महाराष्ट्रालाही विकास प्रकल्पांची भेट मिळणार
कोलकत्तामधील पाण्याखालील मेट्रोव्यतिरिक्त, पंतप्रधान कवी सुभाष-हेमंत मुखोपाध्याय मेट्रो विभाग आणि तरातळा-माजेरहाट मेट्रो विभागाचे उद्घाटन देखील पीएम मोदी यांच्या हस्ते होणार आहे. यासोबतच पंतप्रधान मोदी देशभरातील अनेक मोठ्या मेट्रो आणि रॅपिड ट्रान्झिट प्रकल्पांचे उद्घाटन करणार आहेत. याशिवाय पिंपरी चिंचवड मेट्रो-निगडी दरम्यान पुणे मेट्रो रेल्वे प्रकल्प टप्पा 1 च्या विस्तारीकरणाची पायाभरणीही पंतप्रधान करणार आहेत.
#WATCH | India’s first underwater metro rail service in Kolkata set to be inaugurated by PM Modi on 6th March pic.twitter.com/ib5938Vn8x
— ANI (@ANI) March 5, 2024
हेही वाचा :
प. बंगाल सरकारला हायकाेर्टाचा दणका, संदेशखाली ‘ईडी’वरील हल्ल्याचा तपास सीबीआयकडे
‘निवडणुकीदरम्यान हिंसाचार खपवून घेतला जाणार नाही ‘: प. बंगालमध्ये मुख्य निवडणूक आयुक्तांची स्पष्टोक्ती
मालदीवच्या राष्ट्राध्यक्षांनी पुन्हा ओकली भारताविराेधात गरळ; म्हणे, “भारतीय सैनिक..”
Latest Marathi News देशातील पहिल्या पाण्याखालील ‘मेट्रो’चे उद्या PM मोदींच्या हस्ते उद्घाटन Brought to You By : Bharat Live News Media.
