प्रा जी. एन. साईबाबा यांच्यासह पाच आरोपींची निर्दोष मुक्तता

नागपूर ; Bharat Live News Media वृत्तसेवा : नक्षलवाद्यांशी असलेल्या कथित संबंधांच्या आरोपाखाली अटकेत असलेले दिल्ली विद्यापीठाचे प्राध्यापक जी. एन. साईबाबा यांना मुंबई उच्च न्यायालयाने अखेर मंगळवारी (दि.५) रोजी निर्दोष मुक्त केली आहे. जी. एन. साईबाबा आणि इतरही चार आरोपीना न्यायालयाने निर्दोष घोषित केले. तब्बल १० वर्षानंतर ५० हजारांच्या जात मुचलक्यावर सोडण्याचे निर्देश दिलेत. या माध्यमातून राज्य सरकार आणि पोलीस दलाला मोठा धक्का न्यायालयाने दिल्याचे बोलले जाते.
संबंधित बातम्या
CM Eknath Shinde: आता एमएमआरडी क्षेत्रातही डीप क्लिन ड्राईव्ह :मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
‘निवडणुकीदरम्यान हिंसाचार खपवून घेतला जाणार नाही ‘: प. बंगालमध्ये मुख्य निवडणूक आयुक्तांची स्पष्टोक्ती
Indians at Israel | लेबनॉन हल्ल्यानंतर इस्रायलमधील भारतीयांच्या सुरक्षेसाठी जारी केली ॲडव्हाजरी
UAPA लावताना नियमानुसार कारवाई झाली नव्हती. तसेच साईबाबा आणि इतर आरोपींच्या ठिकाणातून पुरावे खास करून डिजिटल पुरावे गोळा करताना नियम पाळले गेले नव्हते, तसेच प्रोसिक्युशनने ठेवलेले पुरावे जी. एन. साईबाबा आणि इतर आरोपींचे नक्षलवाद्यांशी संबंध सिद्ध करु शकले नाहीत. या आधारावर जी. एन. साईबाबा, प्रशांत राही, हेम मिश्रा, महेश तिरकी आणि विजय तिरकी या सर्वांची सुटका करण्यात आली असल्याची माहिती वकील हर्षल लिंगायत यांनी दिली.
दरम्यान, मेरिटवर न्यायालयाने निर्णय दिलाय, डिजिटल पुरावे आणि प्रा. साईबाबांच्या घरी जप्ती झाली होती, ते सिद्ध झालेले नाहीत. बाकी आरोपींकडून जप्त झालेला मुद्देमाल कायद्याप्रमाणे सिद्ध झाला नसल्याने सगळ्या आरोपींना न्यायालयाने निर्दोष मुक्त केले आहे. न्यायालयाला आम्ही स्थगितीची मागणी केली आहे. कोर्टाने आम्हाला लेखी अर्ज करण्यास सांगितले. आम्ही लेखी अर्ज करणार आहोत, त्यानंतर पुढचा निर्णय शासन घेईल अशी प्रतिक्रिया माध्यमांशी बोलताना ॲड. प्रशांतकुमार सत्यनाथन (सरकारी पक्ष) यांनी दिली.
Latest Marathi News प्रा जी. एन. साईबाबा यांच्यासह पाच आरोपींची निर्दोष मुक्तता Brought to You By : Bharat Live News Media.
