जळगाव : युवा संवाद कार्यक्रमात रामनामाचा जयघोष

जळगाव : पुढारी वृत्तसेवा युवा संवाद कार्यक्रमात विद्यार्थ्यांचा मोठ्या प्रमाणात सहभाग असून श्रीरामाच्या गीतावर विद्यार्थ्यांनी रामनामाचा जयघोष करत युवा संमेलनाचा उत्साह द्विगुणित केला आहे. भाजपा आयोजित युवा संवाद संमेलन कार्यक्रमांमध्ये मोठ्या प्रमाणात महाविद्यालयीन युवकांचा सहभाग दिसून येत असून नवमतदारांना मतदान आणि मतदार याबाबतचे महत्व याद्वारे कळणार आहे. काही महाविद्यालयीन विद्यार्थी गणवेशातच युवा संवादामध्ये सहभागी झालेले … The post जळगाव : युवा संवाद कार्यक्रमात रामनामाचा जयघोष appeared first on पुढारी.

जळगाव : युवा संवाद कार्यक्रमात रामनामाचा जयघोष

जळगाव : Bharat Live News Media वृत्तसेवा
युवा संवाद कार्यक्रमात विद्यार्थ्यांचा मोठ्या प्रमाणात सहभाग असून श्रीरामाच्या गीतावर विद्यार्थ्यांनी रामनामाचा जयघोष करत युवा संमेलनाचा उत्साह द्विगुणित केला आहे.
भाजपा आयोजित युवा संवाद संमेलन कार्यक्रमांमध्ये मोठ्या प्रमाणात महाविद्यालयीन युवकांचा सहभाग दिसून येत असून नवमतदारांना मतदान आणि मतदार याबाबतचे महत्व याद्वारे कळणार आहे. काही महाविद्यालयीन विद्यार्थी गणवेशातच युवा संवादामध्ये सहभागी झालेले आहेत. भाजपाचे कार्यकर्ते व नेते विद्यार्थ्यांमध्ये जाऊन त्यांच्याशी संवाद साधत आहे. दरम्यान सभामंडप उभारलेल्या जागेवर युवकांनी श्रीरामाच्या नामाचा जयघोष करत कार्यक्रमाचा उत्साह द्विगुणीत केला आहे. सभास्थळी श्रीरामाचे गीतांनी वातावरणामध्ये जल्लोष निर्माण झालेला आहे. वादक व गीतकार कार्यक्रम ठिकाणी श्रीरामाचे गीत गाऊ लागल्याने याठिकाणी राममय वातावरण झाले आहे.
Latest Marathi News जळगाव : युवा संवाद कार्यक्रमात रामनामाचा जयघोष Brought to You By : Bharat Live News Media.