जाती-धर्माच्या नावावर राजकारणाचा उकिरडा : आ. लहू कानडे

टाकळीभान : पुढारी वृत्तसेवा : राजकारणात किळसवाणी स्पर्धा सुरू असल्याने जाती-धर्माच्या नावावर राजकारणाचा उकिरडा झाला असून, तडीपार गुंडांना राजकारणी स्वतःच्या गाडीत बसून घेत असल्याने राजकारणाचा दर्जा घसरला आहे, अशी टीका आ. लहू कानडे यांनी केली. टाकळीभान येथील प्रो कबड्डी खेळाडू शिवम पटारे याची ग्रामस्थांतर्फे मिरवणूक व सन्मान सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. त्या वेळी आ. … The post जाती-धर्माच्या नावावर राजकारणाचा उकिरडा : आ. लहू कानडे appeared first on पुढारी.

जाती-धर्माच्या नावावर राजकारणाचा उकिरडा : आ. लहू कानडे

टाकळीभान : Bharat Live News Media वृत्तसेवा : राजकारणात किळसवाणी स्पर्धा सुरू असल्याने जाती-धर्माच्या नावावर राजकारणाचा उकिरडा झाला असून, तडीपार गुंडांना राजकारणी स्वतःच्या गाडीत बसून घेत असल्याने राजकारणाचा दर्जा घसरला आहे, अशी टीका आ. लहू कानडे यांनी केली. टाकळीभान येथील प्रो कबड्डी खेळाडू शिवम पटारे याची ग्रामस्थांतर्फे मिरवणूक व सन्मान सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. त्या वेळी आ. कानडे बोलत होते. अध्यक्षस्थानी शिवछत्रपती पुरस्कार विजेते प्रा. सुनील जाधव होते. जिल्हा काँग्रेसचे उपाध्यक्ष सचिन गुजर, ज्ञानेश्वर मुरकुटे, बापूसाहेब पटारे, माजी जिल्हा क्रिडाधिकारी अजय पवार, कबड्डीचे राष्ट्रीय प्रशिक्षक अनिल जगदाळे, कैलास जगदाळे, प्रवीण काळे प्रमुख म्हणून उपस्थित होते.
या वेळी आ. कानडे म्हणाले की, राजकारणाच्या माध्यमातून विकासकामे होणारच आहेत. मात्र, खेळाडू तयार होणे गरजेचे आहे. विविध क्रिडा प्रकारात खेळाडू निर्माण होण्यासाठी मतदारसंघातील प्रत्येक गावात 5 लाख रुपयांचे व्यायामाचे साहित्य आमदार निधीतून दिले आहे. येथील ग्रामीण क्रीडा संकुलासाठीही आवश्यक ती मदत करण्याचे आश्वासन देऊन शिवमचे अभिनंदन केले. या वेळी सचिन गुजर, ज्ञानेश्वर मुरकुटे, सुनील जाधव, अजय पवार यांनीही खेळाडूंना मार्गदर्शन केले. या वेळी मंजाबापू थोरात, राहुल पटारे, उपसरपंच कान्हा खंडागळे, राजेंद्र कोकणे, पाराजी पटारे, प्रा. कार्लस साठे, आबासाहेब रणनवरे, गजानन कोकणे, भाऊराव सुडके, गोरख कोकणे, प्रा. जयकर मगर, रवी गाढे, राहुल कोकणे, क्रीडाशिक्षक लड्डू शेख, अनिल पटारे आदी उपस्थित होते. राहुल पटारे यांनी प्रास्ताविक केले. सूत्रसंचालन संतोष मते यांनी केले. बाजार समितीचे संचालक मयुर पटारे यांनी आभार मानले.
टाकळीभान येथे दुसर्‍यांदा दिवाळी!
नुकत्याच पार पडलेल्या प्रो कबड्डी लीग स्पर्धेतील दहाव्या सिझनचा अंतिम सामना टाकळीभानचा भूमिपुत्र संघनायक असलेला अस्लम ईनामदार याच्या नेतृत्वाखालील पुणेरी पलटन संघ व स्टार खेळाडू ठरलेल्या शिवम पटारे याच्या हरियाणा स्टीलर्स या दोन संघात झाल्याने विजयासाठी या दोन्ही संघातील दोघांनीही चिवट खेळी केली. एक हरला व एक जिंकला असला तरी या विजयाने टाकळीभान येथे पुन्हा एकदा दिवाळी साजरी झाली.
हेही वाचा

पाटबंधारेच्या हलगर्जीपणानेे पाणीबाणी; चिचोंडीतील ग्रामस्थांची तहान कशी भागणार?
भाजपशी दगा केला म्हणूनच धडा शिकवला : आशिष शेलार
चाकण परिसरात बिबट्याची दहशत; महिन्यात 10 शेळ्या, 1 घोडी ठार

 
Latest Marathi News जाती-धर्माच्या नावावर राजकारणाचा उकिरडा : आ. लहू कानडे Brought to You By : Bharat Live News Media.