राहुल गांधी यांची महाराष्ट्रातील पहिली सभा नंदुरबारमध्ये होणार

नंदुरबार – Bharat Live News Media वृत्तसेवा
काँग्रेस नेते राहुल गांधी (Rahul Gandhi – President of Indian National Congress) यांची भारत जोडो न्याय यात्रा १२ मार्च रोजी महाराष्ट्रात दाखल होणार असून त्यादरम्यान राहुल गांधी यांची या ठिकाणची पहिली जाहीर सभा घेतली जात आहे. त्यादृष्टीने सोमवार (दि.४) रोजी महाराष्ट्र काँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात यांनी माजी मंत्री के. सी. पाडवी यांच्या समवेत सभेच्या जागेची पाहणी केली.
काँग्रेस नेते राहुल गांधी (Rahul Gandhi – President of Indian National Congress) यांची भारत जोडो न्याय यात्रा मंगळवार, दि.१२ मार्च रोजी महाराष्ट्रात दाखल होणार आहे. नंदुरबार जिल्हा काँग्रेस पक्षाला लकी मानला जात असल्यामुळे गांधी यांची महाराष्ट्रातील पहिली सभा नंदुरबारमध्ये व्हावी, यावर काही नेते आग्रही आहेत. त्या पार्श्वभूमीवर, सोमवार (दि.४) महाराष्ट्र काँग्रेसचे वरिष्ठ नेते बाळासाहेब थोरात, माजी मंत्री के. सी. पाडवी यांच्यासह पदाधिकाऱ्यांनी नंदुरबार शहरातील पोलीस मैदानावरील हेलिपॅडच्या जागेची तसेच सभास्थळ म्हणून तळोदा रोडवरील मोदी ग्राउंडची पाहणी केली. नवापूर विधानसभेचे आमदार तथा नंदुरबार जिल्हा काँग्रेस चे कार्याध्यक्ष शिरीष नाईक, माजी कार्याध्यक्ष दिलीप नाईक, चौरे, प्रतिभा शिंदे आणि अन्य नेते व पदाधिकारी त्यांच्या समवेत होते. यावेळी आमचे दै. Bharat Live News Mediaचे पत्रकार योगेंद्र जोशी यांनी सभेबाबत माहिती विचारली असता बाळासाहेब थोरात यांनी सांगितले की, लोकसभा निवडणुकीच्या दृष्टीने जागा वाटपाचे निर्णय अंतिम टप्प्यात आले असल्याचे सांगितले. तसेच नंदुरबार लोकसभा मतदारसंघासाठी काँग्रेसकडून कोण उमेदवारी करणार? या प्रश्नाच्या उत्तरात त्यांनी सांगितले की, अद्याप कोणताही उमेदवार निश्चित झालेला नाही. इच्छुकांची यादी वरिष्ठांच्या विचाराधीन आहे. माजी मंत्री के. सी. पाडवी यांचे नाव यादीच्या अग्रस्थानी असल्याचे देखील ते म्हणाले.
Latest Marathi News राहुल गांधी यांची महाराष्ट्रातील पहिली सभा नंदुरबारमध्ये होणार Brought to You By : Bharat Live News Media.
