नोकरी करणार्या महिलेला पोटगी मागण्याचा अधिकार

मुंबई : Bharat Live News Media वृत्तसेवा : एखादी महिला नोकरी करीत असली तरी पतीपासून विभक्त राहिल्यावर तिला पोटगी मागण्याचा हक्क आहे असा महत्वपूर्ण निर्वाळा दंडाधिकारी न्यायालयाने दिला. दंडाधिकारी सुजितकुमार तायडे यांनी पतीपासून विभक्त झालेली महिला तिच्या मूलभूत गरजा भागवण्या साठी काही काम करीत असली तरी पत्नीला पोटगी देण्याचे कायदेशीर आणि नैतिक कर्तव्य पती झटकू शकत नाही, असा महत्वपूर्ण निर्वाळा देताना कौटुंबिक हिंसाचाराच्या प्रकरणात विभक्त पत्नीला दरमहा 75 हजार रुपये देण्याचे आदेश दिले.
संबंधित बातम्या
आंबेगाव तालुक्यात 1157 कोटी रुपयांची विकासकामे सुरू : अजित पवार
अजित पवारांनी केला शिवाजीराव आढळराव पाटलांसोबत एकाच गाडीतून प्रवास
चाकण परिसरात बिबट्याची दहशत; महिन्यात 10 शेळ्या, 1 घोडी ठार
पती, सासू-सासरे, दीर आणि जाऊबाईकडून होणार्या मानसिक व शारीरिक छळाला कंटाळून विवाहितेने 2016 मध्ये न्यायालयात धाव घेऊन तक्रार दाखल केली. ती न्यायमिळावा म्हणून गेली आठ वर्षे अॅड.अंतरा जयंत आणि अॅड.कनिष्क जयंत यांनी न्यायालयीन लढा दिला.
या प्रकरणी दंडाधिकारी सुजितकुमार तायडे यांच्यासमोर सुनावणी झाली. यावेळीअॅड. अंतरा जयंत आणि अॅड. कनिष्क जयंत यांनी आठ वर्षा विवाहित महिलेला सासरच्या सामाईक घरातून हाकलून देण्यात आले होते. तसेच पतीने तिच्याकडे हुंडा म्हणून 5 कोटी रुपयांची मागणी करीत जीवे मारण्याची धमकीही दिली होती, याकडे न्यायालयाचे लक्ष वेधले.
सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या महत्वपूर्ण निर्णयांचा हवाला दिला. त्याची गंभीर दखल घेत दंडाधिकारी सुजितकुमार तायडे यांनी अर्जदार विवाहितेला दरमहा 50 हजार रुपयांची अंतरिम पोटगी आणि पर्यायी घराचे भाडे देण्यासाठी दरमहा 25 हजार रुपये देण्याचे आदेश पतीला दिले.
Latest Marathi News नोकरी करणार्या महिलेला पोटगी मागण्याचा अधिकार Brought to You By : Bharat Live News Media.
