लखनौ हादरले..! पोलीस निरीक्षकाची गोळ्या घालून हत्‍या

लखनौ हादरले..! पोलीस निरीक्षकाची गोळ्या घालून हत्‍या

पुढारी ऑनलाईन डेस्‍क : उत्तर प्रदेशची राजधानी लखनौ शहरात पोलीस निरीक्षकाची गोळ्या घालून हत्‍या करण्‍यात आली. या घटनेने शहरात खळबळ उडाली आहे. पोलीस हल्‍लेखोराचा तपास करत आहेत.
लखनौ शहरातील कृष्णनगरच्या मानस नगरमध्ये पोलीस निरीक्षक सतीश कुमार सिंह आपल्या कुटुंबासह राहत होते. रविवारी ते नातेवाईकांच्‍या घरी गेले होते. तेथून ते आपल्‍या कुटुबांसमवेत कारमधून परतले. घराबाहेर कार पार्क करून पत्नी आणि मुलीसह खाली उतरताच एका हल्‍लेखोराने त्‍यांच्‍यावर अंदाधूंद गोळीबार केला.यामध्‍ये सतीश कुमार यांचा जागीच मृत्‍यू झाला. पोलिसांनी तत्‍काळ घटनास्‍थळी धाव घेतली. हल्‍लेखोराचा शोध सुरु आहे, अशी माहिती पोलिस सूत्रांनी दिली.
हेही वाचा : 

Hyderabad building fire | हैदराबादमध्ये गोदामाला आग, ६ जणांचा होरपळून मृत्यू
Vijay Wadettiwar : विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवारांना जीवे मारण्याची धमकी; मुख्यमंत्र्यांकडे सुरक्षा वाढवण्याची मागणी
घटस्फोट न घेता ‘लिव्‍ह -इन’मध्‍ये राहणे व्‍यभिचारच : पंजाब व हरियाणा उच्‍च न्‍यायालय

 
The post लखनौ हादरले..! पोलीस निरीक्षकाची गोळ्या घालून हत्‍या appeared first on पुढारी.

पुढारी ऑनलाईन डेस्‍क : उत्तर प्रदेशची राजधानी लखनौ शहरात पोलीस निरीक्षकाची गोळ्या घालून हत्‍या करण्‍यात आली. या घटनेने शहरात खळबळ उडाली आहे. पोलीस हल्‍लेखोराचा तपास करत आहेत. लखनौ शहरातील कृष्णनगरच्या मानस नगरमध्ये पोलीस निरीक्षक सतीश कुमार सिंह आपल्या कुटुंबासह राहत होते. रविवारी ते नातेवाईकांच्‍या घरी गेले होते. तेथून ते आपल्‍या कुटुबांसमवेत कारमधून परतले. घराबाहेर कार …

The post लखनौ हादरले..! पोलीस निरीक्षकाची गोळ्या घालून हत्‍या appeared first on पुढारी.

Go to Source