मृत्यू कुठे, कसा होईल याचा नेम नाही; धावत्या टँकरचालकाचा मृत्यू

नाशिक (मनमाड) : Bharat Live News Media वृत्तसेवा
कोणाचा मृत्यू कुठे आणि कसा होईल याचा नेम नाही. अशीच घटना मनमाड शहरात समोर आली आहे. टँकर चालविताना चालकाला हृदयविकाराने मृत्यू झाल्याची घटना मनमाड-चांदवड रोडवर घडली. मात्र, चालकाचा मृत्यू झाल्यानंतर टँकरने ट्रॅक्टरला धडक दिल्यामुळे दोन महिला तसेच एक जण जखमी झाला. त्यानंतर टँकर दुभाजकावर आदळून थांबला.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार भारत पेट्रोलियम कंपनीचा (एमएच 15, झेड 4873) हा टँकर घेऊन चालक नाना जगताप (48, रा. डॉ. आंबेडकर चौक) हे पानेवाडी प्रकल्पात इंधन भरण्यासाठी घेऊन जात असताना चांदवड रोडवरील पाटील पेट्रोलपंपाजवळ त्यांना हृदयविकाराचा जबर धक्का बसला. त्यात त्यांचा जागीच मृत्यू झाला. मात्र, त्यानंतर टँकरने ट्रॅक्टरला मागून धडक दिली. यात ट्राॅलीत बसलेल्या दोन महिलांसह एक जण जखमी झाले. त्यानंतर टँकर दुभाजकावर आदळला. घटनेनंतर परिसरातील नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली. मात्र, चालकाचा मृत्यू झाल्याचे दिसून आले. माहिती कळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पाहणी करून टँकर ताब्यात घेतला.
हेही वाचा:
Maoist Links Case | माओवाद्याशी संबंध प्रकरण : जीएन साईबाबा यांच्यासह ५ आरोपींची निर्दोष मुक्तता
वनमजुरांच्या समस्या निकाली काढणार : मुख्य वनसंरक्षक प्रवीण यांची ग्वाही
मोनो रेल प्रकल्पाला विरोध; कोथरूड येथे स्वाक्षरी मोहीम
Latest Marathi News मृत्यू कुठे, कसा होईल याचा नेम नाही; धावत्या टँकरचालकाचा मृत्यू Brought to You By : Bharat Live News Media.
