‘आरबीआय’चा Paytm नंतर IIFLला दणका, गोल्ड लोनवर बंदी, शेअर्स धडाधड कोसळले

पुढारी ऑनलाईन : दिग्गज फिनटेक फर्म पेटीएम बँकेवर बंदी लागू केल्यानंतर आता रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (RB) ने आणखी एका कंपनीला दणका दिला आहे. आरबीआयने आयआयएफएल फायनान्सला (IIFL Finance) तत्त्काळ गोल्ड लोन मंजूर करणे अथवा लोन वितरण थांबवण्यास सांगितले आहे. सोन्याची शुद्धता आणि निव्वळ वजन तपासण्यात आणि प्रमाणित करण्यात गंभीर विचलन तसेच कर्ज मंजूर करताना … The post ‘आरबीआय’चा Paytm नंतर IIFLला दणका, गोल्ड लोनवर बंदी, शेअर्स धडाधड कोसळले appeared first on पुढारी.
‘आरबीआय’चा Paytm नंतर IIFLला दणका, गोल्ड लोनवर बंदी, शेअर्स धडाधड कोसळले

Bharat Live News Media ऑनलाईन : दिग्गज फिनटेक फर्म पेटीएम बँकेवर बंदी लागू केल्यानंतर आता रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (RB) ने आणखी एका कंपनीला दणका दिला आहे. आरबीआयने आयआयएफएल फायनान्सला (IIFL Finance) तत्त्काळ गोल्ड लोन मंजूर करणे अथवा लोन वितरण थांबवण्यास सांगितले आहे. सोन्याची शुद्धता आणि निव्वळ वजन तपासण्यात आणि प्रमाणित करण्यात गंभीर विचलन तसेच कर्ज मंजूर करताना आणि लिलावाच्या वेळेस लोन टू व्हॅल्यू रेशो (एलटीव्ही) चे उल्लंघन केल्याचे तपासणीत आढळून आल्याचे आरबीआयने म्हटले आहे.
दरम्यान, आरबीआयच्या या कारवाईनंतर IIFL Finance चा शेअर्स मंगळवारी एनएसईवर सुरुवातीच्या व्यवहारात तब्बल २० टक्क्यांनी घसरून ४७७ रुपयांपर्यंत खाली आला. (IIFL Finance Share Price)
“आरबीआयने भारतीय रिझर्व्ह बँक कायदा, १९३४ च्या कलम ४५ L(1)(b) अंतर्गत आपल्या अधिकारांचा वापर करून, IIFL फायनान्स लिमिटेडला, तात्काळ प्रभावाने गोल्ड लोन मंजूर करणे अथवा कर्ज देणे/सुरक्षित करणे/विक्री करणे थांबवण्याचे निर्देश दिले आहेत.” असे RBI ने जारी केलेल्या एका प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे.
३१ मार्च २०२३ पर्यंतच्या कंपनीच्या आर्थिक स्थितीबाबत आरबीआयने केलेल्या तपासणीनंतर हा निर्णय घेण्यात आला. ज्यात आरबीआयला कंपनीच्या कामकाजात काही विशिष्ट क्षेत्रांमध्ये विसंगती आढळून आली. आरबीआयने म्हटले आहे की वरील उल्लंघनांमुळे ग्राहकांच्या हितावर लक्षणीय आणि प्रतिकूल परिणाम होतो.
दरम्यान, RBI ने IIFL ला नेहमीच्या कलेक्शन आणि रिकव्हरी प्रक्रियेद्वारे त्याच्या विद्यमान गोल्ड लोन पोर्टफोलिओची सेवा सुरू ठेवण्याची परवानगी दिली आहे.
कंपनीकडून खुलासा
आरबीआयच्या कारवाईनंतर कंपनीने एक निवेदन जारी करत म्हटले आहे की, “आम्ही गोल्ड लोन पोर्टफोलिओमध्ये आरबीआयच्या निष्कर्षाचे लवकरात लवकर पालन करण्यासाठी आम्ही वचनबद्ध राहू आणि ग्राहकांच्या हितासाठी गोल्ड लोन सेवा प्रदान करण्याचा आमचा प्रयत्न सुरू ठेवू”.
हे ही वाचा ;

मोटार विम्याच्या किरकोळ रकमेसाठी दावा का नको?
वेध शेअर बाजाराचा | जीडीपीची कमाल, बाजारात धमाल
जाणून घ्या शेअर मार्केटमधील घडामोडी
बचत : ‘टॅक्स हार्वेस्टिंग’ म्हणजे काय?

 
 
Latest Marathi News ‘आरबीआय’चा Paytm नंतर IIFLला दणका, गोल्ड लोनवर बंदी, शेअर्स धडाधड कोसळले Brought to You By : Bharat Live News Media.