माओवाद्याशी संबंध प्रकरण : जीएन साईबाबा यांच्यासह ५ आरोपींची निर्दोष मुक्तता

पुढारी ऑनलाईन डेस्क: कथित माओवाद्यांशी संबंध असलेल्या प्रकरणात दिल्ली विद्यापीठाचे माजी प्राध्यापक जीएन साईबाबांसह इतर पाच आरोपींची हायकोर्टाने आज (दि.५) निर्दोष मुक्तता केली. मुंबई हायकोर्टाने त्यांच्या तात्काळ सुटकेचे आदेश दिले आहेत. शहरी नक्षलवाद प्रकरणात प्राध्यापक जी.एन. साईबाबा यांच्यासह इतर पाच जणांना २०१४ मध्ये अटक झाली होती. दरम्यान आज (दि.५) मुंबई हायकोर्टाने त्यांची या प्रकरणातून निर्दोष मुक्ताता … The post माओवाद्याशी संबंध प्रकरण : जीएन साईबाबा यांच्यासह ५ आरोपींची निर्दोष मुक्तता appeared first on पुढारी.

माओवाद्याशी संबंध प्रकरण : जीएन साईबाबा यांच्यासह ५ आरोपींची निर्दोष मुक्तता

Bharat Live News Media ऑनलाईन डेस्क: कथित माओवाद्यांशी संबंध असलेल्या प्रकरणात दिल्ली विद्यापीठाचे माजी प्राध्यापक जीएन साईबाबांसह इतर पाच आरोपींची हायकोर्टाने आज (दि.५) निर्दोष मुक्तता केली. मुंबई हायकोर्टाने त्यांच्या तात्काळ सुटकेचे आदेश दिले आहेत. शहरी नक्षलवाद प्रकरणात प्राध्यापक जी.एन. साईबाबा यांच्यासह इतर पाच जणांना २०१४ मध्ये अटक झाली होती. दरम्यान आज (दि.५) मुंबई हायकोर्टाने त्यांची या प्रकरणातून निर्दोष मुक्ताता केली आहे. (Maoist Links Case)
मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने मंगळवारी दिल्ली विद्यापीठाचे माजी प्राध्यापक जीएन साईबाबा आणि अन्य पाच जणांना माओवाद्यांशी संबंध असलेल्या कथित प्रकरणात बेकायदेशीर कृती प्रतिबंधक कायद्यांतर्गत (UAPA) दोषी ठरवले होते. दरम्यान आज (दि.५) त्यांना मुंबई हायकोर्टाने मोठा दिलासा दिला आहे. न्यायमूर्ती विनय जोशी आणि न्यायमूर्ती वाल्मिकी एसए मिनेझिस यांच्या खंडपीठाने हा निकाल दिला आहे. (Maoist Links Case)
Maoist Links Case: 2014 मध्ये या सहा आरोपींना अटक करण्यात आली होती
भारतातील माओवादी संघटनांशी संबंध असल्याच्या आणि भारताविरुद्ध भूमिका घेतल्याच्या आरोपाखाली प्राध्यापक जी.एन. साईबाबा आणि त्यांच्या सहआरोपींना 2014 मध्ये अटक करण्यात आली होती. त्यानंतर या प्रकरणातील सहा जणांची तब्बल ९ वर्षांनंतर निर्दोष मुक्तता झाली आहे.
जीएन साईबाबा यांच्यावर असे होते आरोप
महाराष्ट्रातील गडचिरोली येथील सत्र न्यायालयात खटल्यादरम्यान, फिर्यादी पक्षाने असा युक्तिवाद केला होता की, “आरोपी आरडीएफसारख्या आघाडीच्या संघटनांद्वारे प्रतिबंधित सीपीआय (माओवादी) गटासाठी काम करत होते. गडचिरोलीतील जीएन साईबाबा यांच्या सांगण्यावरून जप्त केलेले पॅम्प्लेट्स आणि देशविरोधी मानले जाणारे इलेक्ट्रॉनिक साहित्य यासह पुराव्यावर फिर्यादीचा विश्वास होता. साईबाबाने अबुझमद वनक्षेत्रात नक्षलवाद्यांना आश्रय देण्यासाठी 16 जीबी मेमरी कार्ड दिल्याचा आरोपही करण्यात त्यांच्यावर करण्यात आला होता.
हे ही वाचा:

प्रा.जीएन साईबाबांच्या अडचणीत वाढ; मुंबई उच्च न्यायालयाचा आदेश सर्वोच्च न्यायालयाकडून रद्द
GN Saibaba acquittal | माओवाद्यांशी संबंध प्रकरणी साईबाबांच्या निर्दोष मुक्ततेला सुप्रीम कोर्टाची स्थगिती

The post माओवाद्याशी संबंध प्रकरण : जीएन साईबाबा यांच्यासह ५ आरोपींची निर्दोष मुक्तता appeared first on Bharat Live News Media.

Go to Source