धार्मिक कट्टरतावाद प्रकरणी ‘NIA’चे ७ राज्‍यांमध्‍ये छापे

पुढारी ऑनलाईन प्रकरणे : बंगळूर कारागृह धार्मिक कट्टरतावाद प्रकरणी राष्‍ट्रीय तपास संस्‍थेने (एनआयए) आज (दि. ५ मार्च) कर्नाटक, तामिळनाडूसह सात राज्‍यांमध्‍ये १७ ठिकाणी छापे टाकले. बंगळूरमधील परप्‍पाना अग्रहारा मध्‍यवर्ती कारागृहात पाच कैद्‍यांना कट्टरपंथी बनवल्‍याचा प्रकार मागील वर्षी उघड झाला होता. दहशतवादी संघटना लष्‍कर-ए-तोयबाचा नसीर,जुनैद अहमद या प्रकरणातील आरोपी आहे. नसीर हा २०१३ पासून परप्‍पाना अग्रहारा … The post धार्मिक कट्टरतावाद प्रकरणी ‘NIA’चे ७ राज्‍यांमध्‍ये छापे appeared first on पुढारी.
धार्मिक कट्टरतावाद प्रकरणी ‘NIA’चे ७ राज्‍यांमध्‍ये छापे

Bharat Live News Media ऑनलाईन प्रकरणे : बंगळूर कारागृह धार्मिक कट्टरतावाद प्रकरणी राष्‍ट्रीय तपास संस्‍थेने (एनआयए) आज (दि. ५ मार्च) कर्नाटक, तामिळनाडूसह सात राज्‍यांमध्‍ये १७ ठिकाणी छापे टाकले.
बंगळूरमधील परप्‍पाना अग्रहारा मध्‍यवर्ती कारागृहात पाच कैद्‍यांना कट्टरपंथी बनवल्‍याचा प्रकार मागील वर्षी उघड झाला होता. दहशतवादी संघटना लष्‍कर-ए-तोयबाचा नसीर,जुनैद अहमद या प्रकरणातील आरोपी आहे. नसीर हा २०१३ पासून परप्‍पाना अग्रहारा मध्‍यवर्ती कारागृहात जन्मठेपेची शिक्षा भोगत आहे. त्‍याच्‍या संपर्कात मोहम्मद उमर, मोहम्मद फैसल रब्बानी, तनवीर अहमद, मोहम्मद फारूख आणि जुनैद अहमद संपर्कात आले. त्‍याने या पाच जणांना २०१७ मध्‍ये कट्टरपंथी बनवले. तसेच दहशतवादी कारवाया करण्यासाठी तयार केल्‍याचे एनआयएच्‍या तपासात उघड झाले होते.
या प्रकरणी जुलै २०२३ मध्‍ये बंगळूर पोलिसांनी केलेल्‍या कारवाईत सात पिस्‍तुलंसह चार हातबॉम्‍ब, एक मॅगझिन, ४५ थेट राउंड आणि चार वॉकी-टॉकीसह शस्‍त्रे आणि दारुगोळा जप्‍त केला होता. बंगळूर शहर पोलिसांनी या प्रकरणी गुन्‍हा दाखल केला होता.
आज ‘एनआयए’ने थमीम अशोक आणि हसन अली या संशयितांना चेन्नई येथे छापा टाकून अटक केली. थमीम अशोक टी नगर हा एका ज्वेलरी दुकानात काम करर होता. त्‍याच्‍या रामनाथपुरम येथील घराचीही झडती घेण्‍यात आली आहे. या प्रकरणी आतापर्यंत सहा जणांना अटक करण्‍यात आली आहे.

#WATCH | Ramanathpuram, Tamil Nadu: NIA is conducting searches across seven states in the Bengaluru Prison Radicalisation case.
(Visuals from Keezhakarai Paruthippara Street and Palaniappa area) pic.twitter.com/YWnvPyh2wN
— ANI (@ANI) March 5, 2024

हेही वाचा :

NIA Raids In India: एनआयएची दहशतवादविरोधी मोठी कारवाई; ISIS चे बल्लारी मॉड्यूल उद्ध्वस्त
लेक लाडकी योजना : पिवळ्या व केशरी रेशनकार्डधारक कुटुंबात जन्मलेल्‍या मुलींना मिळणार ‘हा’ लाभ

Latest Marathi News धार्मिक कट्टरतावाद प्रकरणी ‘NIA’चे ७ राज्‍यांमध्‍ये छापे Brought to You By : Bharat Live News Media.