‘लेक लाडकी योजनेसाठी १९ कोटी ७० लाखाचा निधी वितरित’

मुंबई ; पुढारी वृत्‍तसेवा या योजनेअंतर्गत पिवळया व केशरी रेशन कार्डधारक कुटुंबात जन्माला आलेल्या मुलींना जन्मानंतर अनुदान देण्यात येणार आहे. यासाठी १९ कोटी ७० लाखाचा निधी वितरित करण्यात आला आहे, अशी माहिती महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी दिली. एकात्मिक बाल विकास सेवा योजना आयुक्तालय, नवी मुंबई मार्फत ३६ जिल्ह्यांना १९.७० कोटी (रुपये १९ … The post ‘लेक लाडकी योजनेसाठी १९ कोटी ७० लाखाचा निधी वितरित’ appeared first on पुढारी.
‘लेक लाडकी योजनेसाठी १९ कोटी ७० लाखाचा निधी वितरित’

मुंबई ; Bharat Live News Media वृत्‍तसेवा या योजनेअंतर्गत पिवळया व केशरी रेशन कार्डधारक कुटुंबात जन्माला आलेल्या मुलींना जन्मानंतर अनुदान देण्यात येणार आहे. यासाठी १९ कोटी ७० लाखाचा निधी वितरित करण्यात आला आहे, अशी माहिती महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी दिली.
एकात्मिक बाल विकास सेवा योजना आयुक्तालय, नवी मुंबई मार्फत ३६ जिल्ह्यांना १९.७० कोटी (रुपये १९ कोटी ७० लाख) वितरीत करण्यात आले आहेत. याबाबत जिल्हा स्तरावर जिल्हा निहाय व तालुका स्तरावर कॅम्प आयोजित करुन १ एप्रिल २०२३ नंतर जन्मलेल्या मुलींना लाभ देण्याची कार्यवाही विभागामार्फत करण्यात येत आहे.
आतापर्यत जवळपास ३५ हजार प्रस्ताव जिल्हा कार्यालयात प्राप्त झालेले असून, पुढील १५ दिवसांत तालुका निहाय / जिल्हा निहाय कॅम्प आयोजित करण्यात येत असून पात्र लाभार्थींनी जवळच्या बाल विकास प्रकल्प कार्यालयात संपर्क साधावा असे आवाहन मंत्री तटकरे यांनी केले आहे.
या योजनेअंतर्गत पिवळया व केशरी शिधा पत्रिकाधारक कुटुंबात जन्मलेल्या मुलींना लाभ दिला जाईल. मुलींच्या जन्मानंतर ५ हजार रुपये, इयत्ता पहिलीत ६ हजार रुपये, सहावीत ७ हजार रुपये, अकरावीत ८ हजार रुपये तर लाभार्थी मुलीचे (वय १८ वर्षे) पूर्ण झाल्यानंतर तिला ७५ हजार रुपये या प्रमाणे एकूण रुपये १,०१,०००/- एवढी रक्कम देण्यात येईल.
ही योजना दिनांक १ एप्रिल २०२३ रोजी वा त्यानंतर जन्माला येणा-या एक अथवा दोन मुलींना लागू राहील, तसेच एक मुलगा व एक मुलगी असल्यास मुलीला लागू राहील. लाभार्थी कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न रक्कम रु. १ लक्ष पेक्षा जास्त नसावे.
हेही वाचा :

Death threat to PM Modi | काँग्रेसचा उल्लेख करत पीएम मोदींना ठार मारण्याची धमकी, गुन्हा नोंद 
Israel | लेबनॉनच्या क्षेपणास्त्र हल्ल्यात इस्रायलमध्ये एका भारतीयाचा मृत्यू, दोघे जखमी, तिघेही केरळचे

मोटार विम्याच्या किरकोळ रकमेसाठी दावा का नको?, जाणून घ्या अधिक

Latest Marathi News ‘लेक लाडकी योजनेसाठी १९ कोटी ७० लाखाचा निधी वितरित’ Brought to You By : Bharat Live News Media.