PM मोदींनी केले पाकिस्तानच्या नूतन पंतप्रधानांचे अभिनंदन
Bharat Live News Media ऑनलाईन डेस्क : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पाकिस्तानच्या पंतप्रधानपदी निवड झाल्याबद्दल शेहबाज शरीफ यांचे अभिनंदन केले आहे. ( PM Modi congratulates Shehbaz Sharif on Second term as Pakistan Prime Minister )
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी X (पूर्वीचे ट्विटर) वर केलेल्या पोस्टमध्ये म्हटलं आहे की, “पाकिस्तानचे पंतप्रधान म्हणून शपथ घेतल्याबद्दल @CMShehbaz यांचे अभिनंदन.”
पाकिस्तानमध्ये ८ फेब्रुवारी २०२४ रोजी मतदान झाले. निकालात कोणत्याही एका पक्षाला बहुमत मिळाले नाही. अखेर प्रदीर्घ चर्चेनंतर सर्वाधिक जागा मिळवल्या परंतु पीएमएल-एन आणि पाकिस्तान पीपल्स पार्टीने युती सरकार स्थापन करण्यावर सहमती दर्शवली. पंतप्रधानपदासाठी रविवार, ३ मार्च रोजी निवडणूक झाली. पाकिस्तान मुस्लिम लीग-नवाझ (PML-N) पक्षाचे नेते शहबाज शरीफ यांच्या विरोधात इम्रान खान यांच्या पीटीआय पक्षाचे उमेदवार ओमर अयुब खान होते.
संसदेत मतदानावेळी गदारोळ झाला. शरीफ यांना २०१ मते मिळाली तर त्याचे प्रतिस्पर्धी इम्रान खान यांच्या ‘पीटीआय’ पक्षाचे ओमर अयुब खान यांना ९२ मतांवर समाधान मानावे लागले.शेहबाज शरीफ हे ७२ वर्षांचे आहेत. पाकिस्तानचे पंतप्रधानपद तीन वेळा भूषवलेले नवाज शरीफ यांदचे ते बंधू आहेत. पाकिस्तान मुस्लिम लीग-नवाझ (PML-N) पक्षाच्या निवडणूक प्रचाराचे त्यांनी नेतृत्व केले होते.
Congratulations to @CMShehbaz on being sworn in as the Prime Minister of Pakistan.
— Narendra Modi (@narendramodi) March 5, 2024
हेही वाचा :
Israel | लेबनॉनच्या क्षेपणास्त्र हल्ल्यात इस्रायलमध्ये एका भारतीयाचा मृत्यू, दोघे जखमी, तिघेही केरळचे
Death threat to PM Modi | काँग्रेसचा उल्लेख करत पीएम मोदींना ठार मारण्याची धमकी, गुन्हा नोंद
The post PM मोदींनी केले पाकिस्तानच्या नूतन पंतप्रधानांचे अभिनंदन appeared first on Bharat Live News Media.