‘इंडिया ऽ 2047’ परिषद : विद्यापीठांना वंचितांपर्यंत पोहचावे लागेल : रमेश बैस

पुणे : पुढारी वृत्तसेवा : भारत प्राचीन काळापासून कायमच शिक्षणाचे माहेरघर राहिलेला आहे. भारतातील तक्षशिला व नालंदा विद्यापीठे ही पूर्वी जागतिक शिक्षणाची केंद्रस्थाने होती, परंतु आता आपल्या देशातील हुशार विद्यार्थी उच्च शिक्षणासाठी परदेशात जात आहेत. मात्र, आता आपण त्यांना जागतिक दर्जाच्या सुविधा उपलब्ध करून देऊन देशातच थांबविण्यासाठी प्रयत्न करायला हवेत, असे मत राज्यपाल रमेश बैस … The post ‘इंडिया ऽ 2047’ परिषद : विद्यापीठांना वंचितांपर्यंत पोहचावे लागेल : रमेश बैस appeared first on पुढारी.

‘इंडिया ऽ 2047’ परिषद : विद्यापीठांना वंचितांपर्यंत पोहचावे लागेल : रमेश बैस

पुणे : Bharat Live News Media वृत्तसेवा : भारत प्राचीन काळापासून कायमच शिक्षणाचे माहेरघर राहिलेला आहे. भारतातील तक्षशिला व नालंदा विद्यापीठे ही पूर्वी जागतिक शिक्षणाची केंद्रस्थाने होती, परंतु आता आपल्या देशातील हुशार विद्यार्थी उच्च शिक्षणासाठी परदेशात जात आहेत. मात्र, आता आपण त्यांना जागतिक दर्जाच्या सुविधा उपलब्ध करून देऊन देशातच थांबविण्यासाठी प्रयत्न करायला हवेत, असे मत राज्यपाल रमेश बैस यांनी मांडले. ते एज्युकेशन प्रमोशन सोसायटी फॉर इंडियातर्फे (ईपीएसआय) आयोजित ‘इंडिया ऽ 2047 : विकसित भारतासाठी उच्च शिक्षणाची भूमिका’ या एकदिवसीय राष्ट्रीय परिषदेत बोलत होते.
ईपीएसआयचे अध्यक्ष तथा रामाय्या विद्यापीठ बंगळुरूचे कुलपती डॉ. एम. आर. जयराम, वेल्लोर इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीचे संस्थापक कुलपती डॉ. जी. विश्वनाथन, एमआयटी एडीटी विद्यापीठाचे कुलगुरू तथा कार्याध्यक्ष प्रा. डॉ. मंगेश कराड, बिर्ला इन्स्टिट्यूट ऑफ आर्ट अँड कॉमर्सचे डॉ. एच. चतुर्वेदी, ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ टेक्निकल एज्युकेशन उपाध्यक्ष डॉ. अभय जेरे, मानव रचना शिक्षण संस्थेचे डॉ. प्रशांत भल्ला उपस्थित होते. ईपीएसआयचे उपाध्यक्ष प्रा. डॉ. कराड हे प्रस्ताविक करताना म्हणाले की, भारताला विकसित करण्यासाठी शिक्षण क्षेत्राची अत्यंत महत्त्वाची भूमिका असणार आहे. प्रास्ताविक प्रा. डॉ. मंगेश कराड यांनी केले. आभार डॉ. प्रशांत भल्ला यांनी मानले.
हेही वाचा

मार्केट यार्डातील डमी अडत्यांवर आजपासून कारवाई : सभापती दिलीप काळभोर
ऑस्ट्रेलियन जंगलात हरवले जर्मन पर्यटक!
व्यावसायिक, नेत्यांमुळे पालिकेच्या उत्पन्नावर परिणाम..

Latest Marathi News ‘इंडिया ऽ 2047’ परिषद : विद्यापीठांना वंचितांपर्यंत पोहचावे लागेल : रमेश बैस Brought to You By : Bharat Live News Media.