‘त्याने’ रेल्वेतच थाटले घर!

बर्लिन : रेल्वेतील प्रवास अनेकांना पसंत असतो. कोणतीही दगदग न जाणवता आल्हाददायक प्रवासाची रेल्वेतील अनुभूती हवीहवीशी वाटत असेल तर त्यात आश्चर्याचे कारण नाही. अर्थात, काही जणांसाठी हा रेल्वेचा प्रवास त्रासदायकही असतो आणि यासाठीही अनेक कारणे असतात. एका 17 वर्षीय युवकाने मात्र चक्क रेल्वेच्या एका डब्यातच संसार थाटलेला असून त्याची उठबस, खाणे-पिणे सारे काही रेल्वेतच होते … The post ‘त्याने’ रेल्वेतच थाटले घर! appeared first on पुढारी.

‘त्याने’ रेल्वेतच थाटले घर!

बर्लिन : रेल्वेतील प्रवास अनेकांना पसंत असतो. कोणतीही दगदग न जाणवता आल्हाददायक प्रवासाची रेल्वेतील अनुभूती हवीहवीशी वाटत असेल तर त्यात आश्चर्याचे कारण नाही. अर्थात, काही जणांसाठी हा रेल्वेचा प्रवास त्रासदायकही असतो आणि यासाठीही अनेक कारणे असतात. एका 17 वर्षीय युवकाने मात्र चक्क रेल्वेच्या एका डब्यातच संसार थाटलेला असून त्याची उठबस, खाणे-पिणे सारे काही रेल्वेतच होते आपले ऑफिसचे कामही तो या रेल्वेतूनच करतो आणि लाखोंची कमाईदेखील करतो. आता तो स्वत: तर हे करतोच. पण, इतरांनाही त्याचा हाच सल्ला आहे की, महागडे फ्लॅटस् सोडून द्या आणि रेल्वेत रहायला या!
न्यूयॉर्क पोस्टने दिलेल्या या वृत्तानुसार, जर्मनीतील लेसे स्टॉली या युवकाने 16 व्या वर्षी रेल्वेत बस्तान मांडण्याचा निर्णय घेतला, त्यावेळी अर्थातच कुटुंबियांनी त्याला जोरदार विरोध केला. पण, तो जुमानला नाही आणि आपले सर्व साहित्य निकालात काढत एका बॅगसह लेसे स्टॉलीनंतर कायदेशीर रितीने रेल्वेत स्थिरस्थावर झाला. तो प्रथमश्रेणी डब्यातून प्रवास करतो. डीबी लाऊंजमध्ये नाश्ता करतो आणि स्विमिंग पुलमध्ये स्नान करतो. ज्यावेळी फिरण्याची इच्छा होते, त्यावेळी आपला बॅगपॅकमधील सर्व लवाजमा आवरून तो बाहेर पडतो आणि फिरून झाल्यानंतर त्याचा मोर्चा पुन्हा रेल्वेकडे वळतो.
आता रेल्वेचे प्रथमश्रेणीचे रोजचे तिकीट परवडले नसते. पण, जर्मनीत वार्षिक पास साडेआठ लाख रुपयांना मिळतो आणि वर्षातून ही एकदाच बेगमी करतो. त्याचा एका दिवसाचा प्रवास 1 हजार किलोमीटरच्या आसपास होतो. पण, रेल्वेची आवड असल्याने त्याचा त्रास होत नाही, असे त्याचे म्हणणे आहे.
Latest Marathi News ‘त्याने’ रेल्वेतच थाटले घर! Brought to You By : Bharat Live News Media.