प्राणिसंग्रहालयात बिबट्या पसार; बारा तासांच्या शोधानंतर झुडपाखाली आढळला

कात्रज : पुढारी वृत्तसेवा : कात्रज येथील राजीव गांधी प्राणिसंग्रहालयातील विलगीकरण कक्षात ठेवण्यात आलेला बिबट्या पिंजर्‍याची सळई उचकटून पसार झाला. दिवसभर शोध घेतल्यानंतर रात्री साडेआठच्या सुमारास तो झुडपाखाली आढळला. बिबट्याला पुन्हा पिंजर्‍यात जेरबंद करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. प्राणिसंग्रहालयात प्राण्यांच्या अदलाबदली कार्यक्रमांतर्गत हा बिबट्या कर्नाटकमधील हम्पी येथून आणण्यात आला होता. प्राणिसंग्रहालयातील प्राण्यांच्या अनाथालयात काही दिवसांपासून त्याला … The post प्राणिसंग्रहालयात बिबट्या पसार; बारा तासांच्या शोधानंतर झुडपाखाली आढळला appeared first on पुढारी.

प्राणिसंग्रहालयात बिबट्या पसार; बारा तासांच्या शोधानंतर झुडपाखाली आढळला

कात्रज : Bharat Live News Media वृत्तसेवा : कात्रज येथील राजीव गांधी प्राणिसंग्रहालयातील विलगीकरण कक्षात ठेवण्यात आलेला बिबट्या पिंजर्‍याची सळई उचकटून पसार झाला. दिवसभर शोध घेतल्यानंतर रात्री साडेआठच्या सुमारास तो झुडपाखाली आढळला. बिबट्याला पुन्हा पिंजर्‍यात जेरबंद करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. प्राणिसंग्रहालयात प्राण्यांच्या अदलाबदली कार्यक्रमांतर्गत हा बिबट्या कर्नाटकमधील हम्पी येथून आणण्यात आला होता. प्राणिसंग्रहालयातील प्राण्यांच्या अनाथालयात काही दिवसांपासून त्याला विलगीकरणात ठेवण्यात आले होते. सोमवारी सकाळी साधारणतः नऊ वाजता कर्मचार्‍यांना बिबट्या पिंजर्‍यात दिसला नाही.
या घटनेची माहिती प्राणिसंग्रहालय संचालक डॉ. राजकुमार जाधव व भारतीय सर्पविज्ञान संस्था संचालक नीलिमकुमार खैरे यांना दिली. या वेळी पिंजर्‍याची पाहणी केली असता पिंजर्‍याच्या लहान भागाच्या वरच्या बाजूची सळई उचकटलेली दिसली. बिबट्या तेथून निसटला असल्याचा अंदाज अधिकार्‍यांनी व्यक्त केला. या पिंजर्‍याजवळ बिबट्याच्या पाऊलखुणा व लाकडाच्या वखारी जवळ केस अडकलेले आढळले. त्यामुळे तो त्या मार्गाने गेला असावा. त्यादृष्टीने सीसीटीव्ही कॅमेर्‍यांच्या मदतीने दिवसभर शोध घेतला. बिबट्या पसार झाल्याचे लक्षात आल्यानंतर प्राणिसंग्रहालय पर्यटकांसाठी बंद ठेवण्यात आले होते. सकाळपासून बिबट्याला शोधण्यासाठी प्राणिसंग्रहालयात पथके तैनात करण्यात आली असून, रात्री उशिरापर्यंत बिबट्या निदर्शनास आला नाही. मात्र, रात्री साडेआठच्या सुमारास तो आढळल्याने पथकांनी सुटकेचा निःश्वास सोडला. त्यानंतर तीन पिंजरे लावून बिबट्याला जेरबंद करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. लवकरच यश मिळेल, असा विश्वास संचालक डॉ. राजकुमार जाधव यांनी व्यक्त केला.
ट्रक, प्राण्यांच्या आवाजाने बिबट्या अस्वस्थ
रविवारी रात्री प्राणिसंग्रहालयात प्राण्यांच्या अदलाबदली कार्यक्रमांतर्गत चार प्राणी ट्रकमधून आणण्यात आले. त्यांना खाली उतरविण्याचे काम पहाटे तीन वाजेपर्यंत सुरू होते. त्या ठिकाणी विलगीकरणात असलेल्या बिबट्याचा पिंजरा होता. ट्रक व प्राण्यांच्या आवाजाने बिबट्या अस्वस्थ होऊन त्याने सळई वाकवून पळ काढला असावा, असा अंदाज अधिकार्‍यांनी व्यक्त केला.
पहाटेच्या सुमारास बिबट्या पिंजर्‍याच्या वरच्या बाजूची सळई उचकटून बाहेर पडला. विलगीकरण कक्षाच्या मागे पाण्याच्या टाकीजवळ झुडपात लपल्याचे आढळले असून, तीन पिंजरे लावले आहेत. त्याला सुरक्षित पिंजर्‍यात जेरबंद करण्याचे प्रयत्न सुरू आहेत.
– श्रीराम शिंदे, विश्वस्त, भारतीय सर्पविज्ञान संस्था

हेही वाचा

वातावरणातील बदलांबरोबर हवाही प्रदूषित!
बँकांना लवकरच पाच दिवसांचा आठवडा
कार्यकर्त्यांत विसंवाद नाही : चंद्रकांत पाटील

Latest Marathi News प्राणिसंग्रहालयात बिबट्या पसार; बारा तासांच्या शोधानंतर झुडपाखाली आढळला Brought to You By : Bharat Live News Media.