कुस्तीगिरांसाठी आनंदवार्ता : कुस्तीगिरांच्या मानधनात दुपटीने वाढ
पुणे : Bharat Live News Media वृत्तसेवा : राज्य, राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय स्तरावर अतुलनीय कामगिरी केलेल्या वयोवृद्ध खेळाडूंना मानधन देण्याची योजना शासनाच्या वतीने सुरू आहे. या मानधनामध्ये शासनाने दुपटीने वाढ केली असून, त्यामध्ये किताब विजेत्यांसह वयोवृद्ध कुस्तीगिरांचाही समावेश करण्यात आला आहे. त्याचबरोबर वार्षिक कमाल उत्पन्न मर्यादा 1 लाखांवरून आता 2 लाख रुपये करण्यात आल्याने कुस्तीगिरांना दिलासा मिळाल्याचे चित्र दिसून येत आहे. राज्य शासनाने अतुलनीय कामगिरी केलेल्या वयोवृद्ध कुस्तीगिरांसाठी 1993 पासून ठरावीक मानधन योजना सुरू केली.
त्यामध्ये 1998 मध्ये वाढ केली. 2001 मध्ये वयोवृद्ध कुस्तीगिरांबरोबरच ‘हिंद केसरी’, ‘रुस्तम ए हिंद’, ‘महान भारत केसरी’ आणि महाराष्ट्र केसरी हे किताब मिळविलेल्या कुस्तीगिरांनाही मानधन देण्याची योजना सुरू केली. त्या वेळी वार्षिक उत्पन्नाची मर्यादा 1 लाख रुपयांपर्यंत वाढविण्यात आली होती. 2012 मध्ये कुस्तीगिरांच्या मानधनात वाढ करून राष्ट्रीयस्तरापर्यंतच्या कुस्तीगिराला 2500 रुपये, आंतरराष्ट्रीय स्तरावरील कामगिरीसाठी 6 हजार रुपये, आशियाईसाठी 4 हजार रुपये, तर अर्जुन पुरस्कार, हिंद केसरी, रुस्तम ए हिंद, भारत केसरी, महान भारत केसरी आणि महाराष्ट्र केसरी किताबाच्या मानकरी असलेल्या मल्लाला 6 हजार रुपयांचे मानधन योजना लागू करण्यात आली.
त्यानंतर कुस्तीगिरांच्या वतीने सातत्याने मानधन वाढीबाबत मागणी केल्यानंतर तब्बल 12 वर्षांनी शासनाकडून त्यात दुपटीने वाढ करण्यात आली आहे. वाढ करण्यात आलेल्या मानधनामध्ये राष्ट्रीयस्तरासाठी 7500 रुपये, आशियाईसाठी 10 हजार रुपये, आंतरराष्ट्रीय स्तरावरील कामगिरी, अर्जुन पुरस्कार, हिंद केसरी, रुस्तम ए हिंद, भारत केसरी, महान भारत केसरी आणि महाराष्ट्र केसरी किताबाचा मानकरी असलेल्या मल्लांना आता 15 हजार रुपयांचे मानधन लागू करण्यात आले आहे.
अनेक वर्षांपासूनची मागणी मान्य
15 हजारांपर्यंत केली वाढ
किताब विजेत्यांसह वयोवृद्ध कुस्तीगिरांचाही समावेश
उत्पन्न मर्यादेतही वाढ
खेळाडूस्तर पूर्वीचे मानधन नवीन मानधन
राष्ट्रीयस्तर 2500 रुपये 7500 रुपये
आंतरराष्ट्रीयस्तर 6 हजार रुपये 15 हजार रुपये
आशियाई 4 हजार रुपये 10 हजार रुपये
अर्जुन पुरस्कार 6 हजार रुपये 15 हजार रुपये
हिंद केसरी 6 हजार रुपये 15 हजार रुपये
रुस्तम ए हिंद केसरी 6 हजार रुपये 15 हजार रुपये
भारत केसरी 6 हजार रुपये 15 हजार रुपये
महान भारत केसरी 6 हजार रुपये 15 हजार रुपये
महाराष्ट्र केसरी 6 हजार रुपये 15 हजार रुपये
हेही वाचा
कोल्हापुरातून काँग्रेसकडून शाहू महाराज?
सहा वर्षे पूर्ण असतील तरच पहिलीत प्रवेश
कोल्हापूर : आघाडी, युती की स्वतंत्र?
Latest Marathi News कुस्तीगिरांसाठी आनंदवार्ता : कुस्तीगिरांच्या मानधनात दुपटीने वाढ Brought to You By : Bharat Live News Media.