‘त्या’ अधिकार्‍यांविरोधात कारवाई करा ः दिव्यांग कल्याण कार्यालयावर मोर्चा

पुणे : पुढारी वृत्तसेवा : जिल्हा समाजकल्याण अधिकारी व वैद्यकीय सामाजिक कार्यकर्ते यांनी डिसेबिलिटी कार्ड कचर्‍यात फेकून दिली. त्यामुळे अपंग नागरिकांचे अतोनात नुकसान झाले आहे. याबाबत संबंधितांवर त्वरित कारवाई करण्यात यावी, यासाठी सोमवारी (दि. 4) प्रहार संघटनेच्या मार्गदर्शनाखाली नीलेश निकम यांच्या उपस्थितीत दिव्यांग कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. दरम्यान, कोणत्याही अधिकार्‍याने या मोर्चाकडे लक्ष न दिल्यामुळे … The post ‘त्या’ अधिकार्‍यांविरोधात कारवाई करा ः दिव्यांग कल्याण कार्यालयावर मोर्चा appeared first on पुढारी.

‘त्या’ अधिकार्‍यांविरोधात कारवाई करा ः दिव्यांग कल्याण कार्यालयावर मोर्चा

पुणे : Bharat Live News Media वृत्तसेवा : जिल्हा समाजकल्याण अधिकारी व वैद्यकीय सामाजिक कार्यकर्ते यांनी डिसेबिलिटी कार्ड कचर्‍यात फेकून दिली. त्यामुळे अपंग नागरिकांचे अतोनात नुकसान झाले आहे. याबाबत संबंधितांवर त्वरित कारवाई करण्यात यावी, यासाठी सोमवारी (दि. 4) प्रहार संघटनेच्या मार्गदर्शनाखाली नीलेश निकम यांच्या उपस्थितीत दिव्यांग कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. दरम्यान, कोणत्याही अधिकार्‍याने या मोर्चाकडे लक्ष न दिल्यामुळे दिव्यांग मोर्चेकरांनी अखेर ‘रास्ता रोको’चा पर्याय निवडला. अखेर पोलिस आणि अधिकार्‍यांनी मध्यस्थी केल्यानंतर खूप वेळ सुरू असलेले आंदोलन लेखी आश्वासनानंतर मागे घेण्यात आले.
शासनाने दिव्यांगासाठी राबविलेल्या विविध योजनांचे लाभ मिळावेत, यासाठी डिसेबिलिटी हे कार्ड अत्यंत उपयोगी असते. मात्र, ही कार्ड कचर्‍यात सापडली. या विरोधात आंदोलन तसेच मोर्चा काढण्यात आला. या वेळी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी अधिकार्‍यांच्या विरोधात घोषणा दिल्या. तसेच ज्या अधिकार्‍यांनी ही कार्ड वाटपासाठी दिली होती. त्यांच्यावर कारवाई करावी. चौकशी समिती नेमून चौकशी करावी. याबरोबरच या दोन अधिकार्‍यांनी शाळांना दिलेल्या मुदतवाढ, मेडिकल फाईल बिले, केलेल्या अंतर्गत बदल्या या सर्वांची चौकशी समिती नेमून करावी, तसेच समितीचा अहवाल जोपर्यंत प्राप्त होत नाही. तोपर्यंत या दोघांना पदापासून दूर ठेवावे, अशी मागणी करण्यात आली आहे.
हेही वाचा

Puzzle Therapy : तणावमुक्तीसाठी अमेरिकेत पझल थेरपीची क्रेझ!
सहा वर्षे पूर्ण असतील तरच पहिलीत प्रवेश
कोल्हापूर : आघाडी, युती की स्वतंत्र?

Latest Marathi News ‘त्या’ अधिकार्‍यांविरोधात कारवाई करा ः दिव्यांग कल्याण कार्यालयावर मोर्चा Brought to You By : Bharat Live News Media.