आम्ही फेस टू फेस बोलणारे आहोत : एकनाथ शिंदे

जळगाव, Bharat Live News Media वृत्तसेवा: महाराष्ट्र राज्यातील डबल इंजिनचे सरकार विकास करण्यासाठी तयार झाले आहे. आम्ही फेस टू फेस बोलणारे व संवाद साधणारे आहोत. शेताच्या बांधावर जाऊन शेतकऱ्यांशी नाते व संवाद साधणारे आहेत. आम्ही सिंगल विंडोंवर सर्व परवानगी देतो. भविष्यात हजारो तरुणांना नोकऱ्या मिळणार आहेत, असे प्रतिपादन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले. तापी पुलावरील पुलाचे भूमिपूजन केल्यानंतर ते जाहीर सभेत आज (दि.४) बोलत होते.
मुक्ताईनगर तालुक्यातील येथील मुंढाळदे (खडकाचे) येथे बांधण्यात येणाऱ्या पुलाचे भूमिपूजन मुख्यमंत्री शिंदे यांच्या हस्ते झाले.
यावेळी मुख्यमंत्री शिंदे म्हणाले की, हे खोक्यांचे सरकार नसून विकासाच्या नव्या रूपाचे प्रारंभ करणारे सरकार आहे. मुक्ताईनगरला आजपर्यंत विकासासाठी मोठ्या प्रमाणात निधी देण्यात आला आहे. शेतकऱ्यांसाठी विकासाची गंगा आणणारे सरकार आहे. दीड वर्षांपूर्वी रखडलेला विकास होण्यासाठी उठाव केला. आणि सर्वसामान्यांचे सरकार राज्यात आणले. शेतकरी, कष्टकरी, महिला, वृद्ध, ज्येष्ठ नागरिक यांच्यासाठी निर्णय घेणारे आमचे सरकार आहे.
आजकाल अनेकांना पोटदुखी सुरू झाली आहे. त्यासाठी बाळासाहेब ठाकरे दवाखाना सुरू केलेला आहे. कारण त्यांची पोटदुखी वाढल्यामुळे दवाखान्यांची संख्याही वाढवावी लागत आहे, असा टोला त्यांनी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना लगावला.
हेही वाचा
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे जळगाव विमान तळावर स्वागत
जळगाव: भरदिवसा १ लाख २१ हजारांची रोकड लांबविली
जळगाव: व्हिडिओ व्हायरलची धमकी देऊन महिलेवर अत्याचार; आरोपीला अटक
Latest Marathi News आम्ही फेस टू फेस बोलणारे आहोत : एकनाथ शिंदे Brought to You By : Bharat Live News Media.
