नवनीत राणांचा पक्षप्रवेश नाही : चंद्रशेखर बावनकुळे

नागपूर, पुढारी वृत्तसेवा : अमरावतीच्य़ा खासदार नवनीत राणा यांचा कुठलाही पक्षप्रवेश होणार नाही, असे भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी माध्यमांशी बोलताना स्पष्ट केले. नवनीत राणा आणि भाजपच्या सर्व मित्र पक्षांना आम्ही या संमेलनाला बोलावले आहे. इथे कोणताही पक्षप्रवेश होणार नाही. सहयोगी म्हणून ते येतील, असेही ते म्हणाले. नितीन गडकरी यांच्या उमेदवारी संदर्भात उलट सुलट चर्चेवर … The post नवनीत राणांचा पक्षप्रवेश नाही : चंद्रशेखर बावनकुळे appeared first on पुढारी.

नवनीत राणांचा पक्षप्रवेश नाही : चंद्रशेखर बावनकुळे

नागपूर, Bharat Live News Media वृत्तसेवा : अमरावतीच्य़ा खासदार नवनीत राणा यांचा कुठलाही पक्षप्रवेश होणार नाही, असे भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी माध्यमांशी बोलताना स्पष्ट केले. नवनीत राणा आणि भाजपच्या सर्व मित्र पक्षांना आम्ही या संमेलनाला बोलावले आहे. इथे कोणताही पक्षप्रवेश होणार नाही. सहयोगी म्हणून ते येतील, असेही ते म्हणाले.
नितीन गडकरी यांच्या उमेदवारी संदर्भात उलट सुलट चर्चेवर उत्तर देताना बावनकुळे म्हणाले की, छोट्या बालकाला सुद्धा कळतं महाराष्ट्रातील कुठलीही सीट जाहीर झालेली नाही. महाराष्ट्रातला संपूर्ण जागा वाटपाचा निर्णय अजून व्हायचा आहे. सगळ्याच ४८ जागांचा निर्णय होईल, काहीतरी राजकारणासाठी बोलायचे आणि राजकीय फायदा घ्यायचा, याला अर्थ नाही, असेही बावनकुळे म्हणाले.
जागा वाटप केंद्रीय पार्लमेंटरी बोर्ड करणार आहे. महायुतीचे जागावाटप होईल, त्यानंतर महाराष्ट्रातील उमेदवारांची यादी जाहीर होईल. प्रत्येकाला आपापल्या जागा मागण्याचा अधिकार आहे. परंतु, जेव्हा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार हे तिघे बसतील त्यानंतरच जागा वाटप होईल.
हेही वाचा 

पंतप्रधान नरेंद्र मोदी नागपूरमार्गे तेलंगणात, पदाधिकाऱ्यांशी हितगुज
Nagpur IT Hub : नागपूर होतेय ‘आयटी हब’ : वारंगा परिसरात ट्रिपल आयटी उद्घाटन 
नागपूरच्या युवा संगीतकार व गीतकार श्रेयस पुराणिकला दोन फिल्मफेअर पुरस्कार

Latest Marathi News नवनीत राणांचा पक्षप्रवेश नाही : चंद्रशेखर बावनकुळे Brought to You By : Bharat Live News Media.