नवी मुंबईत ६६ लाखांचा गंडा घालणाऱ्या दोघांना उत्तर प्रदेशातून अटक

पनवेल: Bharat Live News Media वृत्तसेवा : फॉरेक्स मार्केट आणि क्रिप्टो मार्केटमध्ये पैसे गुंतवल्यानंतर अधिकचा नफा कमवून देतो, असे आमिष दाखवून नवी मुंबईमधील एकाची ६६ लाख २३ हजार १४६ रुपयांची फसवणूक करणाऱ्या २ भामट्यांच्या मुसक्या आवळल्या. नवी मुंबईच्या सायबर पोलिसांच्या पथकाने ही कारवाई उत्तर प्रदेशात केली. मोहिनीश देवेंद्र राजपाल (वय ३५, रा. लखनऊ, उत्तर प्रदेश) आणि अंशुमान अरमान सिंह (वय २३, रा. लखनऊ, उत्तरप्रदेश) असे अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. Navi Mumbai News
या प्रकरणी फिर्यादी यांनी तक्रार दाखल केल्यानंतर नवी मुंबई सायबर पोलिसांनी तपासाला सुरूवात केली होती. यामध्ये फिर्यादी यांची ओळख या दोन्ही आरोपी सोबत फेसबुकच्या माध्यमातून झाली होती. याचवेळी आरोपी यांनी फिर्यादी यांना फॉरेक्स मार्केट आणि क्रिप्टो करन्सीमध्ये पैसे गुंतवल्यास अधिकचा नफा मिळेल, असे आमिष दाखवले. त्यानंतर फिर्यादी यांनी आरोपी यांनी सांगितलेल्या वेगवेगळ्या बँक खात्यावर तब्बल ६६ लाखांहून अधिकची रक्कम जमा केली. यानंतर फिर्यादीच्या लक्षात फसवणूक झाल्याचे लक्षात येताच नवी मुंबई सायबर पोलिसांकडे तक्रार केली. Navi Mumbai News
पोलिसांनी उत्तरप्रदेश गाठून आरोपी मोहिनीश राजपाल याला ताब्यात घेतले. त्याने फसवणूक केल्याची कबुली दिली. आरोपींची ज्या बँक खात्यात पैसे जमा करन घेतले. ती बँक खाती लेटर देऊन सिझ केली आहेत. आरोपींवर जवळपास ११५ सायबर तक्रारी असल्याचे चौकशीतून समोर आले आहे.
Navi Mumbai News अटक केलेल्या आरोपींविरुध्द दाखल गुन्हे :
१) सायबर पोलीस ठाणे, गौतम बुध्दनगर, उत्तप्रदेश
२ ) श्रीकालहस्ती पोलीस ठाणे, आंध्रप्रदेश
३) सायबर पोलीस ठाणे, पुर्व प्रादेशिक विभाग, मुंबई
४) सायबर पोलीस ठाणे, जयपूर, राजस्थान घुक्कर
५) सायबर पोलीस ठाणे, झारखंड
६) हिंजवडी पोलीस ठाणे, पिंपरी-चिंचवड
७) सायबर पोलीस ठाणे, फरिदाबाद, हरियाणा
आरोपीची वैशिष्टयपूर्ण गुन्हे करण्याची पध्दत
आरोपी हे गरजू लोकांना हेरून, मैत्री करून त्यांना विविध बँकेमध्ये चालू (Current) खाते उघडून त्यावर कमिशन देण्याचे आमिष दाखवत होते. सदर बँक खात्यांचा उपयोग सायबर फ्रॉड करण्यास वापरत असल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे.
हेही वाचा
रायगड : ड्रग्स विक्री करणाऱ्या दोन तरुणांना पनवेलमधून अटक
रायगडमध्ये निवासी उपजिल्हाधिकारींची कामचुकार १४ मंडळ अधिकाऱ्यांवर कारवाई
रायगड : साकव कोसळून 2 मुलांचा मृत्यू, दिघोडे-धुतूम खाडी किनार्यावरील घटना
Latest Marathi News नवी मुंबईत ६६ लाखांचा गंडा घालणाऱ्या दोघांना उत्तर प्रदेशातून अटक Brought to You By : Bharat Live News Media.
