गेवराई तालुक्याला दुष्काळाच्या झळा; पिण्याच्या पाण्यासह जनावरांचा चारा प्रश्न ऐरणीवर

गेवराई; पुढारी वृत्तसेवा : विहिरींनी तळ गाठल्याने फेब्रुवारीपासून गेवराई तालुक्यातील सर्वच महसूल मंडळात दुष्काळसदृश निर्माण झाली. समाधानकारक पाऊस न झाल्याने माळराने वाळवंट झाली असून, पावसाळ्यात नदी- नाले खळखळुन वाहीलेच नाहीत. त्यामुळे गावखेड्यातील लहान मोठे पाझर तलावात भर पावसाळ्यात पाण्याचा थेंबही जमा झाला नाही. त्यामुळे पिण्याचे पाणी यासह जनावरांचा चारा प्रश्न ऐरणीवर आला आहे. पावसाळ्यात पावसाचे … The post गेवराई तालुक्याला दुष्काळाच्या झळा; पिण्याच्या पाण्यासह जनावरांचा चारा प्रश्न ऐरणीवर appeared first on पुढारी.

गेवराई तालुक्याला दुष्काळाच्या झळा; पिण्याच्या पाण्यासह जनावरांचा चारा प्रश्न ऐरणीवर

गजानन चौकटे

गेवराई; Bharat Live News Media वृत्तसेवा : विहिरींनी तळ गाठल्याने फेब्रुवारीपासून गेवराई तालुक्यातील सर्वच महसूल मंडळात दुष्काळसदृश निर्माण झाली. समाधानकारक पाऊस न झाल्याने माळराने वाळवंट झाली असून, पावसाळ्यात नदी- नाले खळखळुन वाहीलेच नाहीत. त्यामुळे गावखेड्यातील लहान मोठे पाझर तलावात भर पावसाळ्यात पाण्याचा थेंबही जमा झाला नाही. त्यामुळे पिण्याचे पाणी यासह जनावरांचा चारा प्रश्न ऐरणीवर आला आहे.
पावसाळ्यात पावसाचे प्रमाण अत्यल्प राहिले पर्ययाने भूजल पातळीत समाधानकारक वाढ झालीच नाही. खरीपाचे पावसाअभावी उत्पन्न कमालीचे घटले.शिवाय रब्बी पिकांच्या भीजवणी करीता पाणी टंचाई बहुतांश गावात झाली.फेब्रुवारीच्या पहिल्याच आठवड्यात उजवा कालव्यात पाणी आवर्तन सोडण्यात आल्याने कालवा शिवारातील साधारण २०-२५ गावातील शेत सिंचनात थोडा दिलासा मिळाला.मात्र मार्च हिट सुरु होताच पुन्हा कालवा शिवारातील देखील विहीर, बोअरवेल पाणी पातळीत घट झाली आहे.कालव्यात आणखी दोन आवर्तन सोडण्यात आले तर या भागातील ऊस,फळबागा जिवंत राहणार अशा प्रतिक्रीया शेतक-यातून व्यक्त होत आहे.
ज्वारीची वन्यप्राण्याकडून नासाडी
नोव्हेंबर २०२३ मध्ये अवकाळी पावसाने हजेरी लावली यामुळे ज्वारीची पेरणी साधारण गेवराई तालुक्यात १६ हजार हेक्टरवर झाली.मात्र, वन्यप्राण्याकडून कालवा शिवारातील ज्वारीची नासाडी केल्याने ज्वारीची काढणी देखील जिकरीचे बनले.बहुतेक शेतक-यास उत्पन्न तर सोडाच वैरणीचा प्रश्न भेडसावणारा आहे.

आमच्या शिवारात हिवाळ्यातच पाणी टंचाईचा सामना करावा लागला असून, आता तर मार्च महिना प्रारंभ झाल्याने उन्हाळ्यात जनावरांना वैरणीचा प्रश्न ऐरणीवर येणार आहे.
कल्याण येवले,शेतकरी, धोंडराई
उजवा कालव्यात पाणी आवर्तन आले तर गावातील विहीर-बोअरवेल पाणी पातळीत वाढ होण्यास मदत होते.यावर्षी फेब्रुवारी सोडण्यात आलेल्या पाण्यामुळे दिलासा मिळाला.आणखी दोन पाणी आवर्तन कालव्यास सोडले तरच पाणी अन्यथा टंचाईस सामोरे जावे लागणार.
ज्ञानेश्वर वाघ,शेतकरी, सेलू

Latest Marathi News गेवराई तालुक्याला दुष्काळाच्या झळा; पिण्याच्या पाण्यासह जनावरांचा चारा प्रश्न ऐरणीवर Brought to You By : Bharat Live News Media.