पुणे: दोन हजारांची लाच घेताना राजगुरुनगरचे सर्कल, तलाठी जाळ्यात
राजगुरुनगर: Bharat Live News Media वृत्तसेवा : सात बारावर नोंद घालण्यासाठी दोन हजार रुपयांची लाच घेतल्याप्रकरणी राजगुरुनगरच्या मंडल अधिकारी सविता घुमटकर आणि तलाठी बबन लंघे यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगेहाथ ताब्यात घेतले. ही कारवाई सोमवारी (दि. ३) दुपारी तीन वाजता झाली. लाचलुचपत विभागाच्या पोलीस निरीक्षक प्रणिता सांगोरकर यांच्या नेतृत्वाखाली खेड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
खेड तालुक्यातील महसुल विभागातील सर्वच कार्यालयात काम करून घेण्यासाठी पैसे मोजावे लागतात. प्रांताधिकारी कार्यालय, तहसील कार्यालय आणि संबंधित अधिकाऱ्यांबाबत नागरिकांच्या अनेक तक्रारी आहेत. खेडच्या प्रांत, तहसीलदार यांच्या विरोधात खेड न्यायालयातील ५०० वकिलांनी जिल्हाधिकारी यांच्याकडे तक्रार केली आहे. आजच्या कारवाईने या तक्रारीत तथ्य असल्याची चर्चा राजगुरुनगर शहर व तालुक्यात होत आहे. तालुक्याचे आमदार दिलीप मोहिते पाटील यांनी देखील महसुल विभागाच्या कार्यप्रणालीवरून तक्रारी केल्या आहेत.
हेही वाचा
पुणे महापालिकेची शाळा नंबर वन; पीसीएमसी दुसर्या क्रमांकावर
पुणे : बॅंकेच्या नोटीस वाटपासाठी गेलेल्या व्यक्तीचा धारदार शस्त्राने भोकसून खून
पुणे : मेफेड्रोन तस्करीत फौजदाराचा सहभाग? पोलीस वर्तुळात खळबळ
Latest Marathi News पुणे: दोन हजारांची लाच घेताना राजगुरुनगरचे सर्कल, तलाठी जाळ्यात Brought to You By : Bharat Live News Media.