मोठी बातमी: गुजरातमध्ये काँग्रेसला मोठा धक्का; आणखी एका आमदाराची सोडचिट्ठी

पुढारी ऑनलाईन डेस्क: काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या भारत जोडो न्याय यात्रा सुरू आहे. दरम्यान राहुल गुजरातमध्ये पोहोचण्यापूर्वीच येथे काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे. गुजरात काँग्रेसचे नेते आणि आमदार अर्जुन मोधवाडिया यांनी तब्बल ४० वर्षांनंतर काँग्रेस पक्षाचा राजीनामा दिला आहे. यापूर्वी महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अशोक चव्हाण यांनी देखील पक्षाचा राजीनामा देत, … The post मोठी बातमी: गुजरातमध्ये काँग्रेसला मोठा धक्का; आणखी एका आमदाराची सोडचिट्ठी appeared first on पुढारी.

मोठी बातमी: गुजरातमध्ये काँग्रेसला मोठा धक्का; आणखी एका आमदाराची सोडचिट्ठी

Bharat Live News Media ऑनलाईन डेस्क: काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या भारत जोडो न्याय यात्रा सुरू आहे. दरम्यान राहुल गुजरातमध्ये पोहोचण्यापूर्वीच येथे काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे. गुजरात काँग्रेसचे नेते आणि आमदार अर्जुन मोधवाडिया यांनी तब्बल ४० वर्षांनंतर काँग्रेस पक्षाचा राजीनामा दिला आहे. यापूर्वी महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अशोक चव्हाण यांनी देखील पक्षाचा राजीनामा देत, भाजपचे कमळ हातात धरले. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमी हे काँग्रेस पक्ष आणि गांधी परिवाला मोठे धक्के मानले जात आहेत. (Gujarat Congress)
गुजरात काँग्रेसचे ज्येष्ठ नेते, आमदार अर्जुन मोधवाडिया यांनी आज सोमवारी (दि.४) आपल्या आमदारकीचा राजीनामा गुजरात विधानसभा अध्यक्षांकडे सुपूर्द केला आहे. या संदर्भातील व्हिडिओ ANI या वृत्तसंस्थेने एक्स अकाऊंटवरून शेअर केला आहे. (Gujarat Congress )

Gandhinagar | Gujarat Congress leader Arjun Modhwadia resigns as an MLA of the party. pic.twitter.com/lCclfdP36X
— ANI (@ANI) March 4, 2024

Gujarat Congress leader Arjun Modhwadia resigns from the Congress party.
His letter to party chief Mallikarjun Kharge reads, “…Prabhu Ram is not just Pujaniya to Hindus, but he is the Aastha of Bharat. Declining the invitation to witness pran pratishtha mahotsav has hurt the… pic.twitter.com/jHCpn6nOD1
— ANI (@ANI) March 4, 2024

22 जानेवारीला अयोध्येतील राम मंदिरात झालेल्या अभिषेक सोहळ्याला उपस्थित न राहण्याच्या काँग्रेस हायकमांडच्या निर्णयावर अर्जुन मोधवाडिया नाराज होते. त्यांनी पक्षाविरोधात वक्तव्य केल्यापासून ते काँग्रेस सोडून भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची चर्चा सुरू झाली होती.
हेही वाचा:

Lok Sabha Election 2024 : सांगलीत भाजप, काँग्रेसला समान संधी
Nana Patole : पटोलेंच्या एकला चलो रे नीतीने काँग्रेस संकटात..
लोकसभा निवडणूक : दक्षिण गोव्याचा उमेदवार ठरवताना भाजप, काँग्रेसमोर पेच

 
Latest Marathi News मोठी बातमी: गुजरातमध्ये काँग्रेसला मोठा धक्का; आणखी एका आमदाराची सोडचिट्ठी Brought to You By : Bharat Live News Media.