पंतप्रधान नरेंद्र मोदी नागपूरमार्गे तेलंगणात, पदाधिकाऱ्यांशी हितगुज
नागपूर ; Bharat Live News Media वृत्तसेवा : तेलंगणा दौऱ्याच्या निमित्ताने आज सोमवारी (दि.४) रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे नागपूर विमानतळावर आगमन झाले. गेल्या आठवड्यात पंतप्रधान यवतमाळ येथील बचत गट महिला मेळाव्याच्या निमित्ताने आले होते. त्या दिवशी आणि आजही त्यांनी थेट पदाधिकारी, कार्यकर्त्यांशी संवादावर भर दिला.
संबंधित बातम्या
Gujarat Accident : वडोदरानजीक भीषण अपघात, चिमुकल्यासह एकाच कुटुंबातील पाच ठार
Ranji Trophy 2024 : मुंबईची विक्रमी 48व्यांदा रणजी ट्रॉफी फायनलमध्ये धडक!
तिबेटी बकर्यांचा क्लोन! जाणून घ्या याविषयी
आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान थेट कार्यकर्त्यांशी संवाद साधला. ‘माझा कार्यकर्त्यांना नमस्कार सांगा…’ असे म्हणताच भावनेने कार्यकर्ते उत्साहित दिसले. केंद्रीय महामार्ग मंत्री नितीन गडकरी, प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, शहर अध्यक्ष बंटी कुकडे, जिल्हाध्यक्ष सुधाकर कोहळे, प्रवीण दटके, कृष्णा खोपडे आदींनी त्यांचे स्वागत केले. ही भेट नक्कीच उर्जादायी होती असे बावनकुळे यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले.
दरम्यान, नागपुरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळवरून नांदेड विमानतळावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आगमन झाले. नांदेड येथून हेलिकॉप्टरने ते तेलगंणा राज्यातील आदिलाबादकडे रवाना झाले आहे. या पार्श्वभूमीवर नांदेड विमानतळावर मोठा पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.
Latest Marathi News पंतप्रधान नरेंद्र मोदी नागपूरमार्गे तेलंगणात, पदाधिकाऱ्यांशी हितगुज Brought to You By : Bharat Live News Media.