गुजरातच्या वडोदरानजीकच्या महामार्गावर भीषण अपघात; चिमुल्यासह पाच जणांचा मृत्यू

पुढारी ऑनलाईन डेस्क : गुजरातच्या वडोदराजवळ महामार्गाच्या बाजूला उभ्या असलेल्या कंटेनर ट्रकला कारने धडक दिल्याने भीषण अपघात झाला. रविवारी (दि. ३) रात्री झालेल्या या दुर्घटनेत एका चिमुकल्यासह पाच जणांचा मृत्यू झाल्याची माहिती पोलिसांनी दिली. (Gujarat Accident) एएनआयने दिलेल्या माहितीनुसार, गुजरातच्या वडोदराजवळील राष्ट्रीय महामार्गावर रविवारी रात्री उशिरा हा अपघात झाला. अपघातातील चारचाकीमध्ये दोन पुरुष, त्यांच्या पत्नी … The post गुजरातच्या वडोदरानजीकच्या महामार्गावर भीषण अपघात; चिमुल्यासह पाच जणांचा मृत्यू appeared first on पुढारी.

गुजरातच्या वडोदरानजीकच्या महामार्गावर भीषण अपघात; चिमुल्यासह पाच जणांचा मृत्यू

Bharat Live News Media ऑनलाईन डेस्क : गुजरातच्या वडोदराजवळ महामार्गाच्या बाजूला उभ्या असलेल्या कंटेनर ट्रकला कारने धडक दिल्याने भीषण अपघात झाला. रविवारी (दि. ३) रात्री झालेल्या या दुर्घटनेत एका चिमुकल्यासह पाच जणांचा मृत्यू झाल्याची माहिती पोलिसांनी दिली. (Gujarat Accident)
एएनआयने दिलेल्या माहितीनुसार, गुजरातच्या वडोदराजवळील राष्ट्रीय महामार्गावर रविवारी रात्री उशिरा हा अपघात झाला. अपघातातील चारचाकीमध्ये दोन पुरुष, त्यांच्या पत्नी आणि दोन मुले प्रवास करत होते. हे सर्वजण एकाच कुटुंबातील होते. वडोदरा जिल्ह्यातील कर्जन तालुक्यातून ते परत येत होते, असे एका पोलीस अधिकाऱ्याने पीटीआय या वृत्तसंस्थेने सांगितले. Gujarat Accident
यापूर्वी गुजरातमध्ये २७ फेब्रुवारीला देखील असाच अपघात
यापूर्वी 27 फेब्रुवारी रोजी अहमदाबादमधील ढोलका शहरात वेगवान स्पोर्ट्स युटिलिटी व्हेईकल (एसयूव्ही) थांबलेल्या डंपरला धडकल्याने पाच जण ठार आणि दोन जखमी झाले होते. ढोलका पोलिस स्टेशनच्या अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, शहराजवळील महामार्गावर रस्त्याच्या कडेला असलेल्या डंपरला एसयूव्हीने धडक दिल्याने पहाटे 5 वाजता हा अपघात झाला होता.

#WATCH | Gujarat: Five people of a family, were killed after their car hit a truck parked on the roadside on National Highway 48, in Vadodara. pic.twitter.com/p8Daywlk1M
— ANI (@ANI) March 4, 2024

हेही वाचा

Robin Minz Accident : गुजरात टायटन्सने ३.६ कोटी रूपयांना विकत घेतलेल्या खेळाडूचा अपघात
Latur Accident News : तुळजापूरला दर्शनाला जाताना भीषण अपघातात नांदेडचे ४ तरुण ठार, १ गंभीर जखमी
Accident : मुंबई-पुणे महामार्गावर तीन वाहनांचा अपघात
Jharkhand Train Accident : झारखंडमध्ये मोठी दुर्घटना! जामतारा रेल्वे स्थानकाजवळ १२ जणांच्या अंगावरुन गेली रेल्वे

The post गुजरातच्या वडोदरानजीकच्या महामार्गावर भीषण अपघात; चिमुल्यासह पाच जणांचा मृत्यू appeared first on Bharat Live News Media.

Go to Source