“व्यासपीठ भाजपचे, पण मी…”; खा. नवनीत राणांनी स्पष्ट केली भूमिका

नागपूर; पुढारी वृत्तसेवा: ‘एनडीए’चा घटकपक्ष म्हणून आज (दि.४) नागपुरातील भाजयुमो महासंमेलनाचे निमंत्रण मला आले. “व्यासपीठ भाजपचे आहे, पण मी त्यांच्यासोबतच आहे”, या शब्दात खासदार नवनीत राणा यांनी आपली पुढील दिशा स्पष्ट केली. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्वच राजकीय पक्ष तयारीला लागले आहेत. दरम्यान अनेक पक्षातील हालचालींना वेग आला आहे. पुढे बोलताना खासदार राणा म्हणाल्या, “मी पंतप्रधान … The post “व्यासपीठ भाजपचे, पण मी…”; खा. नवनीत राणांनी स्पष्ट केली भूमिका appeared first on पुढारी.
“व्यासपीठ भाजपचे, पण मी…”; खा. नवनीत राणांनी स्पष्ट केली भूमिका


नागपूर; Bharat Live News Media वृत्तसेवा: ‘एनडीए’चा घटकपक्ष म्हणून आज (दि.४) नागपुरातील भाजयुमो महासंमेलनाचे निमंत्रण मला आले. “व्यासपीठ भाजपचे आहे, पण मी त्यांच्यासोबतच आहे”, या शब्दात खासदार नवनीत राणा यांनी आपली पुढील दिशा स्पष्ट केली. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्वच राजकीय पक्ष तयारीला लागले आहेत. दरम्यान अनेक पक्षातील हालचालींना वेग आला आहे.
पुढे बोलताना खासदार राणा म्हणाल्या, “मी पंतप्रधान मोदी, गृहमंत्री अमित शहा आणि देवेंद्र फडणवीस यांच्यासोबतच आहे. मला लोकसमर्थन असून, पक्षाचे नेतृत्व जो आदेश देईल त्यानुसार मी पुढे जाईन”, असे देखील त्यांनी आज माध्यमांशी बोलताना स्पष्ट केले. (Lok Sabha Election 2024)
PM मोदींमुळे विदर्भाला वेगळी ओळख मिळाली-खासदार राणा
दरम्यान पुढे बोलताना, अमरावती सोडण्याचा मात्र प्रश्नच नसल्याचेही त्यांनी सांगितले. लोकसभेचं मैदान हे फक्त नवनीत राणाचे नाही, सगळ्यांना लढण्याचा अधिकार आहे, मी लढणार हे निश्चित आहे. महायुतीत निर्णय होईल तो होणारच. आमचे जेवढे कार्यकर्ते आहेत ते आमचा परिवार आहेत. त्यांच्या मनात जी उत्सुकता आहे ते मी सुद्धा समजू शकते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यामुळे विदर्भाला वेगळी ओळख मिळाली. गेल्या पाच वर्षात मला अमरावतीचे प्रश्न मांडण्याची, विकासाची संधी मिळाली यावर त्यांनी भर दिला. तसेच पुढे, आज भाजप प्रवेश करणार का? या माध्यम प्रतिनिधींनी विचारलेल्या प्रश्नावर त्यांनी सावध पवित्रा घेतला. (Lok Sabha Election 2024)
हेही वाचा:

Lok Sabha Election 2024: “आम्ही NDA सोबतच”; खासदार नवनीत राणांचा पवित्रा, हाती घेणार कमळ?
राजकारण सोडू, पण नवनीत राणांच्या प्रचाराला जाणार नाही : माजी खासदार आनंदराव अडसूळ
नवनीत राणा जात प्रमाणपत्राचा निकाल लोकसभेपूर्वी? 

The post “व्यासपीठ भाजपचे, पण मी…”; खा. नवनीत राणांनी स्पष्ट केली भूमिका appeared first on Bharat Live News Media.

Go to Source