घरोघरी मातीच्या चुली मालिकेतील हृषिकेश आहे तरी कोण?

पुढारी ऑनलाईन डेस्क : स्टार प्रवाहवर १८ मार्चपासून सुरु होणाऱ्या घरोघरी मातीच्या चुली मालिकेची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत आहेत. मालिकेच्या पहिल्या प्रोमोपासून ज्या हृषिकेश बद्दल इतकं भरभरुन बोललं जातंय त्या हृषिकेषची भूमिका नेमका कोणता कलाकार साकारणार याची कमालीची उत्सुकता होती. अखेर त्या प्रश्नाचं उत्तर संपूर्ण महाराष्ट्राला मिळणार आहे. हृषिकेशची व्यक्तिरेखा साकारणार आहे संपूर्ण महाराष्ट्राचा लाडका … The post घरोघरी मातीच्या चुली मालिकेतील हृषिकेश आहे तरी कोण? appeared first on पुढारी.

घरोघरी मातीच्या चुली मालिकेतील हृषिकेश आहे तरी कोण?

Bharat Live News Media ऑनलाईन डेस्क : स्टार प्रवाहवर १८ मार्चपासून सुरु होणाऱ्या घरोघरी मातीच्या चुली मालिकेची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत आहेत. मालिकेच्या पहिल्या प्रोमोपासून ज्या हृषिकेश बद्दल इतकं भरभरुन बोललं जातंय त्या हृषिकेषची भूमिका नेमका कोणता कलाकार साकारणार याची कमालीची उत्सुकता होती. अखेर त्या प्रश्नाचं उत्तर संपूर्ण महाराष्ट्राला मिळणार आहे. हृषिकेशची व्यक्तिरेखा साकारणार आहे संपूर्ण महाराष्ट्राचा लाडका अभिनेता सुमीत पुसावळे. सुमीतला याआधी आपण अनेक वेगवेगळ्या भूमिकांमधून भेटलोय. मात्र हृषिकेश ही व्यक्तिरेखा त्याने आजवर साकारलेल्या व्यक्तिरेखांपेक्षा वेगळी आहे.

घरोघरी मातीच्या चुली मालिकेतल्या भूमिकेविषयी सांगताना सुमीत म्हणाला, ‘स्टार प्रवाह कुटुंबाचा सदस्य होतोय याचा मनापासून आनंद आहे. मी याआधी साकारलेल्या भूमिकेतून बाहेर पडून काहीतरी नवं करण्याचा प्रयत्न करतोय. ऐतिहासिक आणि पौराणिक मालिकेनंतर कौटुंबिक मालिकेत काम करण्याचा अनुभव घेतोय त्यामुळे प्रेक्षकांप्रमाणेच मी देखील उत्सुक आहे. या मालिकेकडे पहाण्याचा माझा दृष्टिकोन नक्कीच वेगळा आहे. खूप चांगले कलावंत मालिकेत आहेत. एकत्र कुटुंबाची गोष्ट आहे. मला असं वाटतं एकत्र कुटुंब ही रणदिवे कुटुंबातील खरी ताकद आहे.

आपण लहानपणापासून एक गोष्ट ऐकत आलोय की एक लाकडाची काठी तोडणं सोपं आहे मात्र लाकडाची मोळी तोडणं तितकंच अवघड. त्यामुळे कुटुंबाचं महत्त्व अधोरेखित करणारी घरोघरी मातीच्या चुली ही मालिका प्रेक्षकांना आवडेल याची खात्री आहे. नवी मालिका घरोघरी मातीच्या चुली १८ मार्चपासून सायंकाळी ७.३० वाजता पाहता येईल.

Latest Marathi News घरोघरी मातीच्या चुली मालिकेतील हृषिकेश आहे तरी कोण? Brought to You By : Bharat Live News Media.