अजित पवार -आढळराव पाटील यांचा एकाच मोटारीतून प्रवास

मंचर : Bharat Live News Media वृत्तसेवा : मंचर (ता. आंबेगाव) येथे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे स्वागत झाल्यानंतर सहकारमंत्री दिलीप वळसे पाटील, शिवसेनेचे माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी एकाच मोटारीतून प्रवास केला. यावेळी राजकीय खलबते झाल्याची चर्चा सोशल मीडियावर रंगली आहे. Ajit Pawar- Adhalrao Patil
उपमुख्यमंत्री अजित पवार हे शिरूर आणि आंबेगाव तालुक्याच्या दौऱ्यावर असून सोमवारी (दि. ४) सकाळी शिरूर तालुक्यातील मांडवगाव फराटा येथे शेतकरी मेळावा झाल्यानंतर ते हेलिकॉप्टरद्वारे आंबेगाव तालुक्यातील मंचर येथील अण्णासाहेब आवटे महाविद्यालय येथे आले. Ajit Pawar – Adhalrao Patil
यावेळी त्यांचे स्वागत सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील, माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील, उद्योजक देवेंद्र शहा यांनी पुष्पगुच्छ देऊन केले. दरम्यान उपमुख्यमंत्री पवार, दिलीप वळसे- पाटील आणि शिवाजीराव आढळराव पाटील यांनी यावेळी एकाच मोटारीतून प्रवेश केला. महत्त्वाचे म्हणजे शिवाजीराव आढळराव पाटील हे शिवसेनेत असून शिरूर मतदारसंघातून ते राष्ट्रवादीकडून लढणार असल्याची चर्चा आहे. त्यातच त्यांनी उपमुख्यमंत्री पवार यांच्यासोबत प्रवास केल्याने चर्चेला ऊत आला आहे.
Ajit Pawar – Adhalrao Patil सहकारमंत्र्यांच्या घरी एकत्रच केले भोजन
सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील, शिवसेनेचे माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील, उद्योजक देवेंद्र शहा, माजी आमदार पोपटराव गावडे यांच्यासह उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दुपारचे भोजन एकत्र करत जुन्या राजकीय आठवणींना उजाळा दिला. माजी खासदार शिवाजीराव पाटील हे कधीकाळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात होते. त्यांचे सहकारमंत्री वळसे पाटील, माजी आमदार पोपटराव गावडे, उद्योजक देवेंद्र शहा यांच्याशी मैत्रीचे संबंध असल्याने त्यांच्यात बराच वेळ गप्पा सुरू होत्या.
हेही वाचा
पुणे महापालिकेची शाळा नंबर वन; पीसीएमसी दुसर्या क्रमांकावर
पुणे : बॅंकेच्या नोटीस वाटपासाठी गेलेल्या व्यक्तीचा धारदार शस्त्राने भोकसून खून
पुणे : मेफेड्रोन तस्करीत फौजदाराचा सहभाग? पोलीस वर्तुळात खळबळ
Latest Marathi News अजित पवार -आढळराव पाटील यांचा एकाच मोटारीतून प्रवास Brought to You By : Bharat Live News Media.
